मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आता डॉक्टर
मुख्यमंत्री फडणवीस होणार ‘डॉक्टर’ घाडगे न्यूज।प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. रविवारी (१५ मार्च) विद्यापीठाचा ३९ वा पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ राज्यपाल विष्णू देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या समारंभात एकूण ४ हजार ६०२ विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. त्यापैकी ४ हजार १८२ विद्यार्थ्यांना पदवी, ३४६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, तर ७४ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी देण्यात येणार आहे. तसेच ४२ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी संचालक डॉ. अशोक कुमार सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून...