श्रीरामपूरातील पोलिस उपनिरीक्षक वर लाचखोरीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर लाचखोरीचा गुन्हा

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहीर यांच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील यवला येथे कार्यरत असतानाच्या प्रकरणाशी संबंधित असून, त्यांच्यासह दोन खासगी हस्तकांविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाविरुद्ध नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणात अटक न करणे व सहकार्य करण्याच्या मोबदल्यात पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांनी ₹४ लाखांची लाच मागितल्याचा आरोप आहे. नंतर तडजोडीअंती ही रक्कम ₹२ लाख ५० हजारांवर निश्चित करण्यात आली.
यातील ₹५० हजारांची रक्कम ऑनलाइन फोनपे  द्वारे स्वीकारण्यात आल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. ही रक्कम सुनील शिवाजी बोराडे (वय ३४) याने स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन दिलीप बहीर, सुनील शिवाजी बोराडे (वय ३४) आणि जगदीश तुकाराम बोराडे (वय ३८, दोघेही रा. पाटोदा, ता. यवला, जि. नाशिक) यांच्या विरोधात यवला पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पडताळणी अधिकारी पोलीस निरीक्षक पूनम केदार आणि पोलीस निरीक्षक राहुल नाईक हे तपास करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात कोणाकडेही माहिती अथवा तक्रार असल्यास ती नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवावी, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन