प्रसाद नगरच्या जागेचा प्रश्न सोडणण्या साठ केंद्रीय मंत्री ना आठवले यांची भेट
प्रसादनगरचा जागेचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आप्पासाहेब ढूस व सुरेंद्र थोरात यांनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट
अहिल्यानगर, दि. २ ऑक्टोबर २०२६ (प्रतिनिधी) : देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील प्रसादनगर येथील गट क्रमांक ५४२ मधील ४१७ आर जागेचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता केंद्र सरकारच्या दारात पोहोचला आहे. या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून सुमारे २५० कुटुंबे रहीवास वास्तव्यास असून, या कुटुंबांना पक्की घरे व हक्काची जागा मिळावी, यासाठी नगरसेविका पल्लवी वैभव ढूस यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची भेट घेत विनंती केली आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले अहिल्यानगर दौऱ्यावर आले असता अहिल्यानगर येथील भेटीत प्रसादनगर येथील नागरिकांसाठी केंद्र सरकारची PMAY-U 2.0 योजना मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली.
आप्पासाहेब ढूस यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रसादनगर येथील गट क्रमांक ५४२ मधील ४१७ आर जागा डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची आहे. शासनाने या ठिकाणी झोपडपट्टी घोषित केली असून, येथे अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त तसेच ऊसतोड कामगार समाजातील सुमारे २५० कुटुंबे अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत.
या परिसरात नगरपरिषदेच्या माध्यमातून शासकीय निधीतून रस्ते, गटारी, पथदिवे आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या जागेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे आवश्यक असून, जागा मोकळी करणे अथवा विक्री करणे व्यवहार्य नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कारखान्याच्या सभेतही प्रश्न उपस्थित डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या ६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासद आप्पासाहेब ढूस यांनी प्रसादनगरच्या जागेचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून PMAY-U 2.0 अंतर्गत In-situ Slum Redevelopment (AHP/BLC घटक) योजना राबवावी आणि सदर जागा प्रसादनगरमधील रहिवाशांच्या नावे करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
२५० कुटुंबांना मिळावी घरा साठी जागा व्हावी नावावर
सदर योजनेमुळे कारखान्याला केंद्र सरकारकडून जमिनीचा मोबदला मिळण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर प्रसादनगरमधील सुमारे २५० कुटुंबांना हक्काची जागा आणि पक्के घर मिळू शकते. या माध्यमातून देवळाली प्रवरा नगरपरिषद झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दिशेनेही महत्त्वाचे पाऊल पडेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“हा सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. त्यामुळे केंद्र सरकारने विशेष बाब म्हणून या प्रकल्पाला मंजुरी द्यावी,” असा आग्रह नगरसेविका पल्लवी वैभव ढूस यांच्या वतीने आप्पासाहेब ढूस व सुरेंद्र थोरात यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे धरला.
Comments
Post a Comment