घरकुला साठी 20 हजाराची तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

घरकुल मंजुरीसाठी २० हजारांची लाच; ग्रामविकास अधिकारीसह तिघांविरुद्ध गुन्हा
घाडगे न्यूज | प्रतिनिधी
सात्रळ येथे घरकुल योजनेचे पैसे मंजूर करून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारीसह तिघांविरुद्ध मंगळवारी रात्री उशिरा राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी हैदर याकुब पटेल (वय ५६), ग्रामविकास अधिकारी, सात्रळ ग्रामपंचायत, रा. वृंदावन कॉलनी, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, ज्ञानदेव मोहन डुकरे, लिपिक, रा. सात्रळ, तसेच सचिन हौशिबा ब्राम्हणे, गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती राहुरी, रा. लोणी, ता. राहाता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. कारवाईनंतर हैदर पटेल आणि ज्ञानदेव डुकरे यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, गृहनिर्माण अभियंता सचिन ब्राम्हणे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सविता तांबे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, कोणताही लोकसेवक अथवा अन्य व्यक्ती शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तत्काळ अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन