सत्तेत जाणच शाहणपणाच
राजरंग।शिवाजी घाडगे
सत्ये पुढे शहाणपण चालत नसत अस म्हणतात मात्र सत्तेत सहभागी होण हे देखील शहाणपणाचे नाही का तर याच उत्तर देखील होच येईल
कोणाला काय वाटत कोण काय म्हणेल याचा विचार राजकीय व्यक्तींनी करायचा नसतो तो करायचा सर्व सामान्य जनतेने
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौर यांच्या राजकीय भूमिकेमुळे मतदारांमध्ये संभ्रम, नाराजी आणि आत्मपरीक्षणाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की, चूक नेमकी मतदारांची झाली की भाऊसाहेब वाकचौर यांची?
शिर्डी मतदारसंघातील मतदारांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पराभव करून भाऊसाहेब वाकचौर यांना पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून दिले व नंतर सदाशिव लोखंडे यांना डावलून भाऊसाहेब खासदार केले
पहिल्या कार्यकाळात निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसचा मार्ग स्वीकारला. सत्तेच्या समीकरणांचा फायदा होईल आणि विजयाचा मार्ग सुकर होईल, असा त्यांचा राजकीय अंदाज असावा. मात्र त्याचा अपेक्षित लाभ झाला नाही. त्यानंतर जवळपास दहा वर्षे ते सक्रिय संसदीय राजकारणापासून मतदारांनी त्यांना
दूर ठेवले. त्या काळात माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मतदारसंघात आपले स्थान निर्माण केले.
पुढे राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेत फूट पडली आणि अनेक नेत्यांनी आपापले राजकीय मार्ग निवडले. सदाशिव लोखंडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची वाट धरली. दुसरीकडे, राजकीय नेतृत्वाच्या प्रयत्नांतून भाऊसाहेब वाकचौर यांना पुन्हा शिवसेनेची उमेदवारी मिळाली. प्रकृती आणि वयाचा विचार करता अनेकांनी त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र राजकारणात नशीब आणि परिस्थिती दोन्ही महत्त्वाची असतात. मतदारांनी पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि ते खासदार झाले.
परंतु आता पुन्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने मतदारांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. निवडणुकीत ज्या विचारसरणीच्या आणि पक्षाच्या नावावर मते मागितली, त्याच मतदारांचा विश्वास टिकवण्याची नैतिक जबाबदारी लोकप्रतिनिधींवर असते. त्यामुळे अनेक मतदारांना आपण दिलेल्या मताचा सन्मान झाला का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
मतदारसंघातील विकासकामांच्या बाबतीतही विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दोन वर्षांच्या कालावधीत अत्यल्प विकासकामे झाल्याची टीका होत आहे. त्यामुळे मतदारांच्या अपेक्षा आणि वास्तव यामध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे दिसून येते. खासदार म्हणून मिळणारे अधिकार, निधी आणि संधी यांचा मतदारसंघाला कितपत फायदा झाला, याचे उत्तर मतदार शोधत आहेत.
दुसरीकडे, भाऊसाहेब वाकचौर यांचे समर्थक मात्र वेगळा युक्तिवाद मांडतात. त्यांच्या मते, मतदारसंघाच्या विकासासाठी सत्ताधारी पक्षासोबत राहणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळवण्यासाठी सत्तेशी जवळीक गरजेची असते. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय हा राजकीय स्वार्थाचा नसून विकासाच्या दृष्टीने असल्याचा दावा केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर 29 जून रोजी शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिर्डी दौरा होणार आहे. या दौऱ्यात ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. मात्र खासदार भाऊसाहेब वाकचौर यांच्या पक्षांतरावर ते किती भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णयही शिवसेना नेतृत्वाचाच होता. त्यामुळे या प्रकरणात केवळ भाऊसाहेबांवर टीका करून चालणार नाही, तर पक्ष नेतृत्वालाही आत्मपरीक्षण करावे लागेल.
शेवटी प्रश्न पुन्हा त्याच ठिकाणी येऊन थांबतो. भाऊसाहेब वाकचौर यांनी पक्षांतर करून राजकीय भूमिका बदलली, ही त्यांची निवड होती. पण वारंवार त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना संसदेत पाठवणारे मतदारही या प्रक्रियेचा भाग आहेत. त्यामुळे चूक कोणाची याचे उत्तर
Comments
Post a Comment