नगर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे याच्या विरोधात लाच मागणीचा गुन्हा
नगर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांच्याविरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
नगर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले उपनिरीक्षक जयेश मोतीलाल गांगुर्डे यांनी एका प्रकरणात मदत करण्यासाठी 1लाख रुपयाची लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या मामासह 15 नातेवाईकांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्या प्रकरणात मदत करण्यासाठी उपनिरीक्षक गांगुर्डे यांनी तब्बल 2 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. तडजोडीनंतर 1 लाख रुपये स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शविल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
या प्रकरणी अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू अल्हाट यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, कोणताही लोकसेवक शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तत्काळ अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment