माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपात

राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे  भाजपात विधान परिषद आमदार होणार 
राजरंग । शिवाजी घाडगे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. शनिवारी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला रामराम ठोकत त्यांनी भाजपात प्रवेश केला.
ऐके काळी राजकारणात कमळ बघ म्हणून तनपुरे कुटुंबाला राजकीय अव्हान दिले जायचे तेव्हा आता प्राजक्त तनपुरे यांनी मात्र आज कमळ हातात घेऊन कमाल करुन दाखवली ही घटना वरवर सोपी वाटत असली तरी तीतकी सोपी देखील नाही 
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भाजपात प्रवेशानंतर प्राजक्त तनपुरे
यांचे नाव दिल्लीतुन उमेदवार म्हणून जाहीर करेल 
 राजकीय घडामोडीं मध्येही प्राजक्त तनपुरे यांची भूमिका गेल्या काही महिन्यांत चर्चेचा विषय ठरली होती. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी भाजपचे आमदार अक्षय कर्डिले यांना अप्रत्यक्ष मदत केल्याची चर्चा होती. त्यावेळी त्यांना तातडीने विधान परिषद सदस्यत्वाची संधी मिळेल, अशी अपेक्षा नसली तरी स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि राजकीय भवितव्याच्या दृष्टीने त्यांनी भाजपाशी जवळीक वाढविली होती, असे बोलले जात होते.
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडे असली तरी या मतदारसंघात भाजपाकडे तुलनेने अधिक मतांचे संख्याबळ असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही जागा जिंकण्यासाठी भाजपाने मोठी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह काही स्थानिक नेते या जागेसाठी इच्छुक होते. मात्र प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश घडवून आणत पक्षाने एकाच वेळी दोन उद्दिष्टे साध्य केल्याची चर्चा आहे. एकीकडे पक्षाला प्रभावी आणि जनाधार असलेला उमेदवार मिळाला, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला मोठा धक्का दिला.
प्राजक्त तनपुरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी निकटचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आमदार जयंत पाटील यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ महत्त्वाचे ठरल्याचे मानले जाते. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून प्राजक्त तनपुरे यांनी राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळविले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी अजित पवार यांची साथ स्वीकारली. मात्र प्राजक्त तनपुरे यांनी खासदार शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांची प्रतिमा पक्षनिष्ठ नेत्याची निर्माण झाली होती. तथापि, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. बदलत्या राजकीय समीकरणांचा आणि वास्तवाचा विचार करता विरोधी बाकांवर राहून फारसा लाभ होणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी सत्ताधारी भाजपाशी जवळीक वाढविली, ती  अलिकडेच झालेल्या राहुरी विधान संभा पोटनिवडणूकीत 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तनपुरे यांना भाजपात प्रवेश देत विधान परिषद उमेदवारीची संधी उपलब्ध करून दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. प्राजक्त तनपुरे विधान परिषदेवर निवडून आल्यास अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपाची राजकीय ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे देखील जिल्ह्यातील असल्याने भविष्यात जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाचे वर्चस्व अधिक मजबूत होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी प्राजक्त तनपुरे भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाषणादरम्यान त्यांनी चष्मा काढून डोळे पुसल्याचे अनेकांच्या नजरेत भरले. ते आनंदाश्रू होते की दीर्घ राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या वळणाची भावनिक प्रतिक्रिया, याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
  विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आणि बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्यांनी नवीन राजकीय वाट निवडली असून त्याचे दूरगामी परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे.
तथापि, भाजपातील त्यांचा पुढील प्रवास सोपा असेलच असे नाही. पक्षात आधीपासून सक्रिय असलेले स्थानिक नेते, इच्छुक उमेदवार आणि अंतर्गत स्पर्धा यांचा सामना त्यांना करावा लागणार आहे. पक्षप्रवेशाने राजकीय संधींची दारे उघडली असली तरी त्या संधीचे यशात रूपांतर करण्यासाठी त्यांना स्वतःचे राजकीय वजन आणि संघटनात्मक ताकद सिद्ध करावी लागणार आहे.
एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाने अहिल्यानगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाली आहे. या निर्णयाचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला होणार, याचे उत्तर आगामी विधान परिषद निवडणूक आणि पुढील स्थानिक राजकीय घडामोडी देतील. मात्र या एका निर्णयाने जिल्ह्याच्या राजकारणाचा पट नव्याने मांडला गेला आहे, हे नक्की.
विशेष म्हणजे भाजपात प्रवेशानंतर तनपुरे यांच्या निवासस्थानावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत तसेच आगामी विधान परिषद निवडणुकीतील भूमिकेबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर