अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त संगीता मालकर यांचा गौरव

‘पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्राप्त संगीता मालकर यांचा गौरव
प्रतिनिधी:
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचा ‘पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’
प्राप्त झाल्याबद्दल सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संगीता मालकर यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने स्नेह सत्कार करण्यात आला. शहर बँकेचे उपाध्यक्ष तथा श्री विशाल गणपती मंदिराचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते स्नेह गौरव सोहळा संपन्न झाला.
यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस  , पत्रकार शिवाजी घाडगे, कारभारी गरड, चंद्रकांत सोनार उपस्थित होते.  संगीता मालकर यांना श्री विशाल गणेशाची प्रतिमा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना प्रा. माणिक विधाते म्हणाले की संगीता मालकर या महिला सक्षमीकरणासाठी निस्वार्थ भावनेने सातत्याने कार्य करत आहेत. त्या केवळ शिक्षिका नसून समाजातील वंचित, गरजू आणि एकल महिलांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. ‘पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ हा केवळ सन्मान नसून समाजसेवा, स्त्री सक्षमीकरण आणि लोकहितासाठी झटणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.
संगीता मालकर यांनी शिक्षक गुणगौरव पुरस्कारातून प्राप्त झालेली एक लाख दहा हजार रुपयांची रक्कम स्वतःसाठी खर्च न करता गरजू महिलांसाठी शिवणयंत्रे खरेदी करण्यासाठी वापरली. त्यांच्या या कार्यातून समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि बांधिलकी अधोरेखित होत असल्याचे प्रा. विधाते यांनी सांगितले. त्यांच्या उपक्रमांमुळे अनेक महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग मिळाला असून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
संगीता मालकर या कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असून गेल्या ३६ वर्षांपासून त्या शिक्षण क्षेत्रात योगदान देत आहेत. शिक्षणासोबतच त्यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य उभे केले आहे. त्या सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा असून ‘साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र राज्य’च्या तालुका समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत. कोरोना काळात त्यांनी काम केले असून
 कोपरगाव तालुक्यातील एकल महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शिलाई मशीनचे वाटप, शेळीपालनासाठी शेळ्यांचे वितरण, आरोग्य शिबिरे, सॅनिटरी नॅपकिन वाटप तसेच गरजू कुटुंबांना कडधान्यांचे वितरण अशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला याबरोबरच महिलांनी अत्याधुनिक शेती बरोबर पशुपालन साठी पुढाकार घेतला 
याबरोबरच एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य, उच्च शिक्षणासाठी लॅपटॉप उपलब्ध करून देत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. बालकांच्या सक्षमीकरणा साठीही त्यांनी सातत्याने कार्य  करत असून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक जाणीवा निर्माण करण्यासाठी विविध मोहिमा राबवल्या आहेत.
त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची  दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या राज्य महिला आयोगानेही नुकताच त्यांचा विशेष गौरव केला आहे. याआगोदर देखील संगीता मालकर यांना महाराष्ट्र शासनाचे विविध सामाजिक कार्य बद्दल तीनदा पुरस्कार पुरस्कार देऊन गौरविले आहे. अलीकडेच मिळालेल्या ‘पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ एकल महिला कार्यला अधिक उत्तेजन मिळेल. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर