भक्ती व ज्ञान वारकरी संप्रदायाच्या पाया-महंत बद्रीनाथ तनपुरे
ज्ञनोबा तुकाराम पुरस्कार
महंत गुरुवर्य बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'ज्ञनोबा तुकाराम' हा पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल दगडवाडी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला याचवेळी दिवंगत लोकसत्ताचे पत्रकार अशोक तुपे यांच्या पत्नी रजना व श्रीमती छायाताई जाधव यांना रुक्मिणी माता तनपुरे यांच्या स्मरणार्थ आदर्श माता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थांनी आमदार मोनिकाताई राजळे ह्या होत्या
महंत बद्रीनाथ महाराज तनपुरे म्हणाले की नगर जिल्हा ही संताची भुमी आहे आपण शिक्षण क्षेत्रात नोकरीला होतो बद्ली झाली अण जीवन बदलले आध्यात्मिक क्षेत्रात किर्तन सेवा करु लागलो वडिलाचे म्हणजे मोठ्या बाबाचे मार्गदर्शन होते ते जे आध्यात्मिक तत्त्व ज्ञान व अन्न दानाचे काम करतोय मात्र आदर्श माताचा गौरव करुन नारी शक्तीच्या कर्तृत्वाला शाब्बासकी दिलीच पाहीजे सकारात्मक शक्ती पुढे वाईट काहीच टिकत नसते वारकरी संप्रदायचा पतका खांद्यावर घेऊन आपण समाज जागृती केली याला अनेक दातृत्व असलेल्या सदग्रस्तानी मदत केली आपल्या र्धम पत्नी सत्यधामा यांनी आपल्या मातोश्रीवर गुंफेतील बाई हे पुस्तक लिहल्या बदल त्यांना धन्यवाद दिले समाजातील वाईट रुढी पंरपरा हद्दपार होण्या साठी विज्ञान वादी आध्यात्माची गरज असुन स्रयाचा सन्मान देखील गरजेचा आहे
यावेळी आमदार मोनिका राजळे , सत्यभामा तनपुरे,पोलीस पाटील सयाराम बानकर,जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे.हभप जाधव महाराज यांची भाषणे झाली यावेळी पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment