विभागीय संचालक विनीत नारायण

विभागिय संचालक नारायण
साई आदर्श मल्टीस्टेट सारख्या संस्थांनी आर्थिक क्रांती घडवून पतसंस्था चळवळीमध्ये आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. शिवाजी कपाळे यांनी इतर संस्थांना मार्गदर्शन करत असताना  पतसंस्था चळवळीला व सहकाराला योग्य दिशा देण्याचे काम केले असल्याचे मत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ महाराष्ट्र व गोवाचे विभागीय संचालक विनीत नारायण यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ महाराष्ट्र व गोवाचे विभागीय संचालक  विनीत नारायण यांनी साई आदर्श मल्टीस्टेट मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली या प्रसंगी त्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजी कपाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आदर्श पतसंस्थेचे व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज, योग प्रशीक्षक किशोर थोरात, शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन ,हैदराबादचे नकुल सदाफुले आदी मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी सुरुवातीला शिवाजी कपाळे यांनी संस्थेचा लेखाजोखा मांडताना सांगितले की, अगदी दहा वर्षाच्या कालावधीमध्ये संस्थेने 150 कोटी ठेवींचा पल्ला पार केला आहे. अर्थकारणातच नव्हे तर समाजकारणातील संस्था अग्रेसर राहिली आहे. संस्थेच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचबरोबर सभासदांना देखील योग्य न्याय दिला जातो. ठेवीदार, कर्जदार, सभासद या सर्वांचा विश्वास असल्याने संस्था गरुड भरारी घेत आहे.
यावेळी बोलताना विनीत नारायण म्हणाले की, अहमदनगर जिल्हा हा देशाच्या सहकाराला आदर्श ठरला आहे. शिवाजी कपाळे यांच्या साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेबद्दल मी खूप ऐकले होते आज प्रत्यक्षात संस्थेला भेट देऊन मनस्वी आनंद होत आहे. साई आदर्श सारख्या संस्था आर्थिक क्रांती घडवून आणणाऱ्या आहेत. संस्थेचे चेअरमन शिवाजी कपाळे यांच्या अनुभवाचा फायदा केवळ एका संस्थेला होतो असे नाही इतर संस्थांना देखील मार्गदर्शन करून आपल्याबरोबर पुढे नेण्याचा त्यांचा मानस हा खरा आदर्शवत आहे. सहकार चळवळ आणखी रूजावी व त्यातून सर्वसामान्य नागरिकांचे कल्याण व्हावे यासाठी कपाळे यांच्या कामाला आमच्या नेहमी शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर त्यांना ज्या अडचणी येतील त्यासाठी आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर राहूच असा शब्द त्यांनी दिला. यावेळी सुभाष दुशिग, विक्रम जाधव, गोपीनाथ हारगुडे, राहूल खंडागळे, याकुब शेख,तेजस्वी प्रधान, पुजा निघुते, रुपाली गाडेकर ,शांताराम भुजबळ, वीजय डुक्रे, अशोक औटी आदी ऊपस्थीत होते. आभार मँनेजर सचीन खडके यांनी मानले 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद