नगर दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर आयोजन

दिव्यांग शिबीर
जिल्हा रुग्णालय च्या वतीने दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन 
 आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शना खाली प्रहार दिव्यांग क्रांती संघटने च्या वतीने राज्य अध्यक्ष बापुराव काणे याच्या पुढाकारातून दिव्यांग मागणीवरून 
दिव्यांग बांधवांच्या तपासणी शिबिरासाठी अहमदनगर जिल्हा चिकित्सक डाॅक्टर संजय घोगरे  यांच्याकडे मागणी केली होती. आता जिल्हा रुग्णालयाच्या वतीने नगर जिल्यातील 14 तालुक्यातील दिव्यांगा साठी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबीर नगर जिल्हा रुग्णालय येथे 28 एप्रिल पासून प्रत्येक शुक्रवारी तालुका क्रमांने  आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबीर होत असते परंतु जिल्हा मोठा असल्याने दिव्यांग संख्या भरपूर आहे. म्हणून अतिरिक्त तपासणी दिनांक 28/ 4 /2023 रोजी श्रीगोंदा व पारनेर तालुका .12/5 /2023  रोजी राहता व कोपरगाव.तालुका 19 /5/ 2023 रोजी पाथर्डी व श्रीरामपूर. 26/ 5 /2023 रोजी राहुरी व नगर तालुका  2/6/ 2023 रोजी अकोले व संगमनेर. तालुका 9/6/ 2023 रोजी नेवासा व शेवगाव तालुका तसेच 16 /6/ 2023 जामखेड कर्जत तालुक्या तील दिव्यांग तपासणी होणार आहे तरी ज्या दिव्यांग बांधवांना नवीन दिव्यांग प्रमाणपत्र काढायचे नाही किंवा ज्यांना नवीन युनिक आयडी कार्ड मिळाले नाही त्यांनी सकाळी 9 ते 12 या वेळेत उपस्थित राहून या शिबिराचा फायदा घ्यावा . 
बरोबर येताना आधार कार्ड  रेशन कार्ड जुने प्रमाणपत्र  दोन पासपोर्ट फोटो घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष  लक्ष्मण पोकळे  उत्तर नगर चे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे ,जिल्हा समन्वय आप्पासाहेब ढोकणे ,पाटील महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मी देशमुख  जिल्हा सचिव हमीद शेख जिल्हा उत्तर  संपर्कप्रमुख नितीन चौधरी  जिल्हा सल्लागार सलीम शेख जिल्हा समन्वयक राजेंद्र पोकळे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पोपट शेळके व  सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष यांनी आपल्या तालुक्यातील दिव्यांग बांधाची युनिक आयडी कार्ड  प्रमाणपत्र व दिव्यांग बांधव तपासणी लाभ घ्यावा असे आवाहन  करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद