बालसंगोपन योजनेतील लाभार्थीनी बॅक खात्याची माहीती तातडीने द्यावी

बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी बँक खाते क्रमांकाची माहीती लगेच 
द्यावी 

  राज्य शासनाने बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यावर जमा केलेली रक्कम लाभार्थ्याचे  खाते बंद असल्याने अथवा कार्यान्वित नसल्याने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या खात्यावर पुनश्च जमा होत आहे. याबाबत संबंधित लाभार्थ्यांशी दुरध्वनीदवारे वारंवार संपर्क करण्यात येत आहे. परंतु लाभार्त्यांचे दुरध्वनी क्रमांक अस्तित्वात नाही, बंद आहेत, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहेत, तसेच ज्या लाभार्थी, कुटुंबाशी संपर्क झाला त्यांनी बालसंगोपन योजनेच्या लाभासाठीची अत्यावश्यक असणारी खातेक्रमांकाची माहिती देण्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने बालसंगोपन लाभाची रक्कम  खात्यात वर्ग करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.  
            बाल संगोपन योजनेच्या लाभांसाठीची अत्यावश्यक असाणारी लाभार्थी,पालक यांच्या खाते क्रमांकाची माहिती पासबुकचे स्टेटमेंट 16 जुन, 2023 रोजी पर्यंत अदयावत केल्यानंतर ज्या लाभार्थी यांना बालसंगोपन या योजनेचा लाभ मिळालेला नाही फक्त अशाच लाभार्थ्यांनी तातडीने कार्यालयास प्रत्यक्ष संपर्क साधुन कार्यान्वित खातेक्रमांकाची माहिती पासबुकच्या स्टेटमेंटसह सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद