मुख्यमंत्र्यांसमवेत विठुरायाचा शासकीय पुजेचा मान काळे दाम्पत्यला

श्रीक्षेत्र पंढरपुर येथील आषाढी एकादशीनिमित्ताने मुख्यमंत्र्यांसमवेत पांडुरंगाची पुजा करण्याचा यंदाचा मान नेवासा येथील भाविकाला 

यंदा अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी (ता. नेवासा) येथील भाऊसाहेब मोहनीराज काळे त्यांच्या सुविध्द पत्नी मंगल  या शेतकरी दाम्पत्यास मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महापूजेचा मान मिळाला.  काळे दाम्पत्य गेल्या २५ वर्षांपासून महंत भास्करगिरी महाराजांसोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करतात.  

महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा आणि मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून मानाच्या वारकरी दाम्पत्याला दिला जाणारा मोफत वार्षिक बस प्रवास पास मुख्यमंत्री  शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद