राहुरी पोलिसांच्या विरोधात मोर्चा

चिंचाळे ग्रामस्थांचा राहुरी पोलीस विरोधात मोर्चा काढून संभा
 
 केबल चोरी प्रकरणात जाणीवपूर्वक, राजकीय द्वेषातून संशय घेऊन फिर्यादी अंबादास ढाकणे ने दाखल केलेल्या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात यावा व शेतकऱ्याच्या वारंवार  केबल चोरून नेणाऱ्या खऱ्या चोराचा तपास करून  योग्य कारवाई करावी. चींचाळा, गाडकवाडी, दरडगाव, परिसरातील शेतकऱ्यांना केबल व विजमोटार चोरी च्या वारंवार होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे. खोटे गुन्हे.मागे घ्यावेत या मागणी साठी आज राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

चिंचाळे, ता. राहुरी येथे इले. मोटारी च्या केबल चोरी झाल्या प्रकरणी चिंचाळे येथील राजकीय पुढाऱ्यांनी दबाव टाकून अंबादास कोंडीराम ढाकणे या सवर्ण व्यक्तीच्या फिर्यादी नुसार संशयावरूनविनाकारण  परसराम रामदास जाधव व  युवराज रामदास जाधव या अनुसूचित जमातीच्या आदिवासी व्यक्तींवर ३७९ भा.द. वि. अन्वये चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 सदर फिर्याद ही पुर्णपणे खोटी असून राजकीय हेतूने प्रेरित होऊन दाखल केली आहे.कारण फिर्यादीच्या फिर्यादीनुसार केबल चोरी झाल्याची वेळ ही २० मे ते २२ मे अशी आहे ते ठिकाण चिंचोळे शिवारातील बॅक वॉटर च्या परिसरातील आहे.व दिनांक  २६ मे रोजी गाडकवाडी शिवारातील बॅक वॉटर परिसरातील शेतकर्याची केबल चोरी झाल्याची घटना घडली. सकाळी शेतकर्याकडून परिसराची पाहणी झाली व तिथेच पाण्यात सदर केबली आढळून आल्या. शेतकर्यानी रखवालदारातर्फे तेथेच उपलब्ध असलेल्या होडीद्वारे केबल बाहेर काढल्या. व स्वताच्या केबली ओळखून आपआपल्या केबली ताब्यात घेतल्या. याच घटनेचे फोटो काढून केबल चोर सापडले असा माध्यमावर प्रचार करून परसराम जाधव व  युवराज जाधव या दोघांवर ३१ मे रोजी राजकीय दबावाखाली फिर्याद दाखल केली.
  तरी,  या घटनेची ची सखोल चौकशी करून  शेतकर्याच्या वारंवार  केबल चोरून नेणाऱ्या खऱ्या चोराचा तपास करून  योग्य कारवाई करावी .व चींचाळा, गाडकवाडी, दरडगाव, परिसरातील शेतकऱ्यांना केबल व ईले मोटार चोरी च्या वारंवार होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे. व खोटे गुन्हे मागे घ्यावेत ही मागणी या वेळेस करण्यात आली.
   मोर्चाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. संत गाडगबाबा आश्रम शाळेतून मोर्चाला सर्वात झाली. तर, पोलीस स्टेशन राहुरी येथे सभेत रूपांतर झाले. मोर्चा समोर वंचित बहुजन आघाडी चे सचिव संदीप कोकाटे, ॲड. किरण विधाटे, उपसरपंच घमाजी जाधव, दगडु भले, ग्रामपंचायत सदस्य बापू गडधे, वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्ष वर्षाताई बाचकर, डॉ जालिंदर घिगे आदींची भाषणे झाली.
   किरण जाधव, संकेत कोरडे, शांताराम आंबेकर, सूरज पवार, कोंडिराम जाधव, किरण पवार, मच्छिंद्र दूधवडे, रघुनाथ बुळे, राजेंद्र जाधव,ऋषी टेंगळे, संजय गांगड, पारुबाई जाधव, लीलाबाई जाधव, इंदुबाई केदार, भोराबाई काळे, ठकुबाई काळे, भीमाबाई जाधव, कांताराम काळे, गेनुभाऊ जाधव, कुशाबा काळे, नाना काळे, अनिल काळे, सुनील केदार, राजू काळे, अजय जाधव, अक्षय जाधव, प्रशांत जाधव, दिनेश काळे, भारत जाधव, रमेश जाधव, खंडू जाधव, दत्तू काळे, नामदेव जाधव, रावसाहेब जाधव, शंकर पारधे, सुनील दोंदे, प्रवीण भुतांबरे, सागर दुधवडे, विश्वनाथ जाधव, हेमंत गांगड, इत्यादी नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद