देवळाली प्रवरा परिसरात टॅकरने पाणी द्या

देवळाली प्रवरात नगर पालिका हद्दीतील राहुरी फॅक्टरी सह वाड्या वस्तीवर टॅकर ने तातडीने पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीचे निवेदन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष व शहर शिवसेनेच्या वतीने देवळाली प्रवरा नगर पालिकेचे प्रशासकीय नगराध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर किरण सावंत यांना मंगळवारी देण्यात आले यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा अध्यक्ष अशोक थोरे,सह संघटक दत्तात्रय कडु पाटील, देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष अनिल चव्हाण,जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे उपस्थित होते 
देवळाली प्रवरा शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित झाल्याने नागरिकाचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले असुन जो पर्यंत पाईप लाईन दुरुस्तीचे काम होत नाही तोपर्यंत पालिकेच्या टॅंकर र ने पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली 
उपविभागीय अधिकारी किरण सावंत म्हणाले मी स्वतः नियोजन आढावा घेणार आहे तर टॅकर ने पाणी देण्यात येईल तसेच दररोज पाणी दिले जाते तेव्हा नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद