शेती महामंडळाच्या करार शेतीला पाणी देण्यासाठी 40 हजारांची लाच घेणारे तिघे पकडले

पाण्याचा पैसा शेती महामंडळाच्या करारी शेतीस पाणी देण्यासाठी 
40 हजाराची लाच स्विकारताना पाटबंधारेचे तीन कर्मचारी पकडले 
नगरच्या लाच लुचपत विभागाची कारवाई 
यशस्वी सापळा 
तक्रारदार- पुरुष  वय- ५८ वर्ष, रा.महांकाळ वडगांव, तालुका श्रीरामपूर, जि.अहमदनगर
आरोपी
१) आलोसे अंकुश सुभाष कडलग, वय-४२ वर्ष धंदा- नोकरी, कालवा निरीक्षक, वर्ग-३, वडाळा उपविभाग अंतर्गत नॉर्दन ब्रांच, सिंचन शाखा, श्रीरामपूर, जि. अहमदनगर रा.बटवाल मळा, सावित्रीबाई फुले नगर, ढोलेवाडी- गुंजाळवाडी, संगमनेर, ता.संगमनेर, जि.अहमदनगर
२) अनिस सुलेमान शेख, वय- ३४ वर्ष, धंदा-शेती, (खाजगी इसम) रा. निमगाव खैरी, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर
३) संजय भगवान करडे, वय-३८ वर्ष, धंदा-फुल व्यवसाय, (खाजगी इसम) रा. मोरगे वस्ती, ता. श्रीरामपूर, जि.अहमदनगर
लाचेची मागणी- ८५,०००/- ₹ तडजोड अंती ४०,०००/- ₹
लाच स्वीकारली -४०,०००/-₹ 
 ०७/०६/२०२३  लाचेचे कारण -.तक्रारदार यांचे सुनेचे नावे महाराष्ट्र शेती विकास महामंडळ यांचे मालकीचे हरेगाव मळा येथील गट नंबर ३ मधील ३१९ एकर शेती दहा वर्षाच्या करार पद्धतीने कसण्यास घेतलेली आहे. तक्रारदार यांनी सदर क्षेत्रापैकी सध्या 60 एकर ऊस लागवड केली होती. सदर शेतीस पाटबंधारे विभागाचे आवर्तनाद्वारे पाणी मिळते त्यास दर तीन महिन्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाणी पट्टी भरावी लागते. तक्रारदार यांना माहे जानेवारी 2023 ते मार्च 2023 या कालावधीत रुपये 26,280/- पाणीपट्टी आली होती. सदरची पाणीपट्टी तक्रारदार हे शेती महामंडळाचे हरेगाव येथील कार्यालयात भरतात. महामंडळातर्फे सदर पाणीपट्टी पाटबंधारे विभागास वर्ग केली जाते. तक्रारदार यांचे ६० एकर उसाचे क्षेत्र आहे पैकी 35 एकर क्षेत्रासाठी शेतात असलेल्या विहीर व बोअरद्वारे सिंचन करतात उर्वरित 25 एकर साठी पाटबंधारे विभागाकडून कालव्याचे पाणी घेतात. यातील आलोसे अंकुश कडलग यांनी तक्रारदार यांना त्यांचे शेती सिंचनाचे क्षेत्र जास्त असल्याचे सांगून पाटबंधारे विभागामार्फत देण्यात येणारे पाणी अविरत चालू राहू देण्यासाठी एकूण ८५,०००/- रुपये लाच द्यावी लागेल अशी लाच मागणीची तक्रार ला.प्र.वि. अहमदनगर कार्यालयास प्राप्त झाली होती.  त्यानुसार दि. ०७/०६/२०२३ रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आलोसे अंकुश कडलग यांनी आरोपी क्रमांक २ अनिस शेख याचे मार्फतीने तक्रारदाराकडे पंचा समक्ष ८५,०००/- ₹ लाचेची मागणी करून तडजोडी अंती ४०,०००/- ₹ लाचेची मागणी केली व फोनवरील संभाषणाद्वारे दुजोरा दिला. आज दिनांक २५/०८/२०२३ रोजी आरोपी क्रमांक १ अंकुश कडलग याने तक्रारदार यांचे कडून पंचा समक्ष ४०,०००/- रुपये लाच रक्कम स्वीकारून सदर रक्कम आरोपी क्रमांक ३ संजय करडे याचेकडे हस्तांतरित केली. तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर बाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, जि.अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सापळा अधिकारी:- आर.बी. आल्हाट, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर मो नंबर-: ९४२०८९६२६३  पर्यवेक्षण अधिकारी प्रवीण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर मो. नंबर :- ८००७६७९९००
सापळा पथक - पोलीस अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, सचिन सुद्रुक, चापोहेकॉ दशरथ लाड.
मार्गदर्शक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, मो. नंबर- ९३७१९५७३९१, ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र, नाशिक. माधव रेड्डी सो. अपर पोलीस अधीक्षक,  ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र,नाशिक.
मो. नंबर-९४०४३३३०४९.
नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, ला. प्र.वि. नाशिक मो. नंबर ९८२२६२७२८८.
आरोपीचे सक्षम अधिकारी -
अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक.            

 "सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
*@ टोल फ्रि क्रं. १०६४*

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद