ज्वालावर पेट्रोल हल्ला

ज्वालाला पेटवण्याचा डाव 
@पत्रकार शिवाजी घाडगे 
तंटामुक्त गांव ची कमान काढुन टाका 
बहुतांशी गावात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अशा कमानी आपल्या दिमाखात उभ्या असलेल्या पाहिल्या की आपले उर भरून येते मात्र या कमानी आता उतरवण्याची गरज निर्माण झाली आहे कारण राहुरी स्टेशन येथे शनिवारी रात्री साप्ताहिक भडकत्या ज्वालाचे संपादक निसार सय्यद यांच्या घरावर पेट्रोल च्या पॅलस्टीक पिशव्या टाकून घर पेटवण्याचा डाव हाणून पाडण्यात आला असला तरी हा प्रकार नक्कीच गंभीर आहे कुटुंब जागे होते म्हणून पेटवली वहाने विझवण्यात आली सय्यद निसार यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याचा तपास दिवसभर अधारात होता राहुरी ही अतिशय शांत व चांगला तालुका मानला जायचा आता मात्र तसे राहीले नाही निर्भिड पत्रकारीता दैनिकात करण्याचे दिवस काधीच संपले आहे कारण पेड न्युज घेतल्यावर कोण निर्भिड राहणार सामाजिक प्रश्न हळु कमी होत चालले आहेत कारण भांडवलदार वर्तमान पत्राची चाटु गिरी करणारे कागदी वाघा सारखे जिल्ह्यातील पत्रकारीचा दरारा हळु हळु कमी होत चाललाय काय असे आम जनतेला वाटने सहाजिकच आहे कारण महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार स्विकारणारे सकाळचे बाळ बोठे महिला कार्यकर्त्या रेखा जरे खुन प्रकरणात तुरुंगात आहेत 
राहुरीत वर्षा दोन वर्षा पुर्वी दक्ष पत्रकार चे रोहीदास दातीर यांना जिवे मारण्यात आले त्याच्या कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आली आहे 
 निसार सय्यद हे गेली चाळीस वर्षापासून वर्तमान पत्र क्षेत्रात कार्यरत आहेत त्याच्या घरावर हल्ला करण्यात आला हल्ला ज्या कारणातून झाला ते कारण त्याच्या पुतण्या वर अल्पवयीन मुलीस फुस लावून .... फोटो काढल्याचा आरोपा खाली नगर येथील तुरुंगात आहेत ते कुटुंब वडीलांच्या निधना नंतर नगर येथे वास्तव्यास आहेत त्याचा काय निकाल लागायचा तो न्याय देवता देईल ही 
मात्र निसार सय्यद यांचे कुटुंबावर जो प्रसंग ओढवला तो निंदनीय आहे निसार यानी आपला मुलगा व मुलगी डाॅक्टर केले आहेत एका साप्ताहिक च्या पत्रकार ने आपल्या मुलाना चांगले शिक्षण देऊन शिक्षणाचे महत्त्व जाणून दिले 
आज स्वतःचा मुलगा स्वतंत्र विचाराचा झाला आहे निसार याच्या तर भावाचा गेल्या अनेक दिवसांपासून ते विभक्त राहतात मात्र निसार याच्यावर हल्ला हा विचारावर करण्यात आला आहे यामुळे त्यांचे मनोधैर्य खचेल मात्र आज निसार जात्यात आहेत व तुम्ही सुपात उद्या ही वेळ कुणार येईल
 राहुरी पोलीस कडुन फार  अपेक्षा ठेवून चालणार नाही कारण या पोलीस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक सजन्न न-हारडा वर एका पिडीत महिलेने बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे अण या पोलीस ठाण्याचे कारभारी शाळेत भाषणे करण्यात गुंग आहेत विचाराने पागळे त्याच्या पुढे लोडा घोळतात पत्रकारांनी हातातील लेखनी ला धार देण्याची गरज आहे अनेक पक्षा प्रमाने पत्रकारांच्या अनेक संघटना झाल्या पत्रकार निसार याच्या हल्याचा निषेध देखील आम्ही पत्रकारांनी सोशल मिडीयावर हात राखून केला 
बलात्कार करून पळुन गेलाला पोलीस उपनिरीक्षक सजन्न अजून पोलिसांना सापडला नाही मग निसार याच्या घरावर तर रात्री पेट्रोल पिशव्या फेकल्या कायद्याचा धाक नावाला देखील राहीला नाही 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद