महात्मा फुले विद्यापीठात झेंडावंदन

महात्मा फुले कृषि विद्यापीठात देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
विद्यार्थी, कर्मचारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शेतकरी यांनी देशाच्या उज्वल भविष्यासाठी कार्य करावे
संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार

सध्या आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळ पर्वात आहोत. देशाला स्वांतत्र्य मिळण्यासाठी कित्येक स्वातंत्र्य विरांनी आपले बलिदान दिले आहे. हा देश घडविण्यासाठी महात्मा गांधी, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या अनेक थोर पुरुषांनी योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर देशाने मोठी प्रगती केली आहे. 6 ते 7 दशकात आपला देश अन्नधान्य आयात करत होता. आता आपण अन्नधान्यात स्वयंपूर्ण होवून इतर देशांना अन्नधान्य निर्यात करत आहोत. आपले यान चंद्राकडे झेपावत आहे, आयटी क्षेत्रात आपण भरारी घेत आहोत. विद्यार्थी, कर्मचारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शेतकरी यांनी देशाच्या उज्वल भविष्यासाठी कार्य करावे असे आवाहन ध्वजारोहन प्रसंगी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठात देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने, नियंत्रक श्री. विजय पाटील, माजी अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. आनंद सोळंके, सर्व विभाग प्रमुख, एन.सी.सी. अधिकारी लेफ्ट. डॉ. सुनिल फुुलसावंगे, सुरक्षा अधिकारी  गोरक्ष शेटे उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुनिल गोरंटीवार पुढे म्हणाले राष्ट्रीय शैक्षणीक संस्थांच्या क्रमवारीत विद्यापीठाला 36 वे मानांकन मिळाले आहे. शिक्षणासाठी विद्यापीठाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थेंबरोबर सामंजस्य करार केलेले आहेत. विद्यार्थी व कर्मचारी यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी उपक्रम सुरु केला आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी प्राध्यापक व विद्यार्थ्यांना लवकरच परदेशात पाठविण्यात येणार आहे. या वर्षी विद्यापीठाने चार वाण, तीन अवजारे व 62 तंत्रज्ञान शिफारशी प्रसारीत केल्या आहेत. ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र सुरु करणारे हे पहिले कृषि विद्यापीठ आहे. या प्रशिक्षण केंद्रातून 100 ड्रोन पायलट तयार झालेले आहेत. विस्तार शिक्षणामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यापीठाने सुरु केलेले आहेत. यामध्ये फुले बळीराजा अॅप, मफुकृवि आयडॉल्स्, भाकृअप शेतकरी प्रथम कार्यक्रम. विद्यापीठातील शेतकरी प्रथम प्रकल्पातील महिला शेतकरी  सविता नालकर यांना मानाचा समजला जाणारा वसंतराव नाईक कृषि पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रगतीची उंची गाठत आहे. यावेळी एनसीसी अधिकारी डॉ. सुनील फुलसावंगे यांनी परेडचे संचलन केले. सुरक्षा अधिकारी गोरक्ष शेटे यांनी सुत्रसंचालन केले. स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद