तृतीयपंथीय प्रमाणपत्र व ओळखपत्र साठी ऑनलाईन अर्ज करा

जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी प्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त
करुन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करा
 तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावुन घेत त्यांच्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्याबरोबरच तृतीयपंथीयांना प्राथमिक हक्क प्राप्त करून देण्यासाठी तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र, ओळखपत्र जारी करण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासनाने transgender.dosje.gov.in हे पोर्टल  विकसित केले आहे. जिल्हयातील सर्व तृतीयपंथीयांनी नोंदणी करुन तृतीयपंथी असल्याबाबत प्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावे व शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन राधाकिसन देवढे, सहायक आयुक्त, समाज कल्याण अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
ओळखपत्र, प्रमाणपत्रासाठी तृतीयपंथी कुठल्याही ठिकाणावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. ट्रान्सजेन्डर धोरणानुसार एखाद्याची ओळख दर्शविण्यासाठी आणि पासपोर्ट, आधार व इतर कागदपत्रांमध्ये बदल करण्यासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग केला जावू शकतो. त्यामुळे सदर ओळखपत्र, प्रमाणपत्र तृतीयपंथीयांसाठी महत्वाचे आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी स्वंयघोषणापत्र, प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, मतदानकार्ड, दोन रंगीत छायाचित्रे व स्वाक्षरी आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील एकुण ६९ तृतीयपंथीयांची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते  तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात आले आहेत.
 जिल्हयातील तृतीयपंथीय व्यक्तीना आत्मनिर्भर बनविण्याच्या उददेशाने तृतीयपंथीय व्यक्तीच्या मागणीनुसार स्वयंरोजगारासाठीचे प्रशिक्षण शिबीर, कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार सर्व तृतीयपंथी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेण्यास पात्र असुन जिल्हयातील दोन तृतीयपंथीयाना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरीत सर्व तृतीयपंथीयानी संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांच्याशी संपर्क करुन सदर योजनेचा लाभ घ्यावा. तसेच शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार तृतीयपंथीय व्यक्तींना किमान कागदपत्रांमध्ये शिधापत्रिका उपलब्ध करुन देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. शिधापत्रिका प्राप्त करुन घेण्यासाठी तहसिलदार यांच्याशी संपर्क करुन शिधापत्रिका प्राप्त करुन घ्यावी.
  या बाबतीत काही अडचण निर्माण झाल्यास सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, अहमदनगर येथे प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्र. ०२४१ २३२९३७८ ) येथे संपर्क करावा,असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.


Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद