एमपीकेव्हीत अॅन्टी रॅगिंग दिवस साजरा
शिक्षण सुरु असतांना वरिष्ठ विद्यार्थ्यांनी आपल्या कनिष्ठ विद्यार्थ्यांना करियर घडविण्यासाठी मार्गदर्शन करावे. सर्व विद्यार्थ्यांने एकदिलाने राहावे. एकमेकांच्या अडचणी जाणून घेवून त्या सोडविण्यास मदत करावी. विद्यापीठ राबवत असलेले व्यक्तीमत्व विकास कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून आपला फायदा करुन घ्यावा असे आवाहन कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी तथा आंतरविद्या जलसिंचन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयात कुलगु रु डॉ. पी.जी. पाटील आणि अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी रॅगींग डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. महानंद माने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे, सहाय्यक कुलसचिव श्री. आर.डी. पाटील, तांत्रिक अधिकारी डॉ. सुनिल भणगे, विद्यार्थी कल्याण अधिकारी (पम) डॉ. विजय पाटील, डॉ. राजेंद्र क्षिरसागर, कार्यालय अधिक्षक श्री. किरण शेळके उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुनिल भणगे यांनी पदव्युत्तर महाविद्यायाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध नियम व त्यांचे संचलन याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना अँटी रॅगींगची शपथ दिली व कार्यक्रमाचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र क्षिरसागर यांनी केले. यावेळी पदव्युत्तर महाविद्यायलयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment