देवळाली प्रवरा येथील गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह विचार करु
महंत गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह घेण्याची अनेकांकडून मागणी मात्र देवळाली प्रवरा येथील भाविक भक्ताच्या मागणीचा सर्वानुमते ठरेल असे सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यानी सोमवारी म्हटले
माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या पुढाकारातून दोन हजार हुन अधिक देवळाली प्रवरा सह तालुक्यातील भक्त गण देवळाली प्रवरात 177 हरिनाम सप्ताह आयोजित करावा या मागणी साठी गेले होते
यावेळी रामगिरी महाराज म्हणालेकी 128 वर्षा पुर्वी देवळालीत सप्ताह झाला होता आता 2024 सप्ताह व्हावा ही देवळाली प्रवरा येथील भक्ताची ईच्छा आहे मात्र याचा विचार करु दिवसेंदिवस सप्ताह मागणी वाढत आहे तसे नियोजन व अण्य या सप्ताह ची गिनीज बुक मध्ये नोंद झाली आहे गंगागिरी महाराज यांनी सप्ताह सुरु करताना सर्व सामान्य माणूस केद्र बिदु ठेवला होता अनेकांना भक्ती मार्ग पत्कारल्याने त्यांची व्यसने सुटली भक्ती मुळे कुटुंबातील वातावरण चांगले राहते हरिनाम गजर सप्ताह मध्ये होते लाखो भाविक आता या सप्ताह मध्ये येत असतात हे सगळे सर्व सामान्य भक्तांच्या ईच्छा शक्तीवर देवळाली प्रवरा परिसरातील अनेक भक्त बेटाशी जोडले गेलेले आहेत तेव्हा आपला सप्ताह मागणी योग्य आहे मात्र अजून कोण कोण येतय ते पाहु व नंतर ठरवू असे म्हणत असाच उसाह ठेवट पर्यत ठेवा
माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आमची सप्ताह घेण्याची इच्छा असुन आपण ती मान्य करावी व 128 वर्षानंतर देवळाली प्रवरा परिसरात गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह होऊ द्यावा अशी भाविकांच्या वतीने विनंती केली
माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी महंत रामगिरी महाराज याचा सत्कार केला परिसरातील असंख्य भक्त स्व वहानातुन आले होते मोठ्या आनंदाई व हर्ष वातावरण मध्ये नागरिक उपस्थित होते महिला भाविकांची संख्या देखील लक्षणीय होती
Comments
Post a Comment