शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आठ सप्टेंबर शिर्डीत
शिवसेनेची मशाल शिर्डीत पेटणार
संध्या राज्यातील नेत्यांनी शिर्डी लक्ष केले असून
याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. येत्या शुक्रवारी ८ सप्टेंबरला ते नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला भेटी देऊन
परिस्थिती समजून घेतील
दुष्काळी भागाचा पाहणी दौरा
जून ते सप्टेंबर महिना असा पावसाचा कालावधी असतो. आता सप्टेंबर मध्ये देखील समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पाऊस नसल्याने प्रखर उन्हामुळे पिके करपून जाऊ लागली आहेत. तसेच जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे दुष्काळी भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. ८ सप्टेंबरला उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे
शेतकऱ्यांशी संवाद साधणार
उद्धव ठाकरेंचा हा एकदिवसीय दुष्काळी दौरा असणार आहे. ८ सप्टेंबरला सकाळी ते शिर्डी विमानतळावर उतरतील. त्यानंतर राहाता तालुक्यातील राऊत वस्ती, कोलवड गाव या ठिकाणी पाहणी करतील. त्यानंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कातरी या गावात शेतकऱ्यांशी संवाद साधून संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी करणार आहेत. यात कोपरगाव, संगमनेर आणि पुणतांबा या ठिकाणी उद्धव ठाकरे जातील. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतील,अशी माहिती आहे.
Comments
Post a Comment