विज्ञान मेळाव्यात ईश्वरी तोडमल यश
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी येथील दहावी ईश्वरी सुनील तोडमल हिने अखिल भारतीय विज्ञान मेळावा या राष्ट्रस्तरीय स्पर्धेमध्ये विभाग स्तरीय प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले .
राज्य विज्ञान संस्था प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळवा नुकताच रत्नागिरी येथे पार पडला राज्यातून आलेल्या 16 स्पर्धकापैकी ईश्वरी ने छान कामगिरी करत द्वितीय क्रमांकाचे उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. या मेळाव्याच्या अनुषंगाने तिने आहारातील भरड धान्य बाबत स्थिती जाणण्याकरीता तिच्या वसाहतीतील शंभर कुटुंबाचे सर्वेक्षण करून माहिती संकलीत केली त्या कुटूंबाना भरड धान्य आहारात वापर व जाणिव होण्याच्या दृष्टिने झुम मिटिंगद्वारे कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घडवून आणले होते.
ईश्वरी हिने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवून सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ शाळेचे नावलौकिक वाढविले आहे. तिने राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत शोधनिबंध सादरीकरण स्पर्धेत विभागात प्रथम येऊन राज्यात विशेष कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे अहमदाबाद येथे 'युविका' या इस्रो मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत पात्र होऊन तिने अंतरिक्ष विज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम इस्त्रोच्या केंद्रात यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
या कामगिरीसाठी तिला शाळेतील मुख्याध्यापक अरुण तुपविहिरे यांचे विशेष प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. तसेच विज्ञान शिक्षक ,हलिम शेख , सुरेखा आढाव , अनिस सय्यद यांचेही मार्गदर्शन लाभले.
या कामगिरांबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू
डॉ.प्रशांतकुमार पाटील यांनी विशेष कौतुक केले, तसेच सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सभापती डॉ.प्रमोद रसाळ , सचिव डॉ.महानंद माने,खजिनदार महेश घाडगे, मुख्याध्यापक अरुण तुपविहीरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे ,पर्यवेक्षक मनोज बावा, प्रा. जितेंद्र मेटकर यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment