मला आहे तस स्विकारल आयुष्यात पत्नीची मोलाची साथ-जेष्ठ नेते अँड सुभाष पाटील

हे जग सुंदर आहे या जगण्यावर शतदा प्रेम करावे 
मला आहे तस स्विकारल आता कसा बद्दल होणार माझी पत्नी सावित्री सारखी माझ्या सोबत सावली सारखी असे मनोगत जिल्हा परिषद चे माजी बांधकाम समितीचे माजी संभापती जेष्ठ नेते अँड सुभाष पाटील साहेब यांनी अभीष्टचिंतन सोहळ्यात व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुखदेव कुसमुडे होते 
अँड पाटील म्हणाले की आयुष्यात मला चांगलेच लोक भेटले कुटुंब,नातेवाईक,कार्यकर्ते माझ्या स्वभावाला स्विकारले असे असले तरी मी देखील भाभी म्हणतो म्हणजे माझ्या सौभाग्यवती शशिकला यांनी मला सावित्री सारखी साथ दिली 
आज तर कोणालाच काही बोलू नका असे सांगितले असे भाऊक मत व्यक्त करताना भाभी ना डोळ्यात पाणी तरळले व सारा जनसमुदायाने ह्दय हेलावले माझे वजन करण्याची हिंमत आज तगायत राजकारणात कोणाचीच झाली नाही मात्र आज येथे पेढे तुला केली मुळात वाढदिवस पुर्वी साजरे होत नव्हते आता व्हायला लागले म्हणजे वय झाल्याची जाणीव होते आयुष्यात अनेक भले बुरे प्रसंग आले मात्र जनतेच्या प्रेमा मुळे त्याचे काही वाटले नाही मला रिटायर होऊ नका असा फोन आज सकाळीच माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचा आला होता व मोबाईल वर अनेकांनी शुभेच्छा दिल्या मात्र येथे उपस्थित असलेला जनसमुदाय पाहून आपण भारावून गेलो व आयुष वाढल्याची जाणीव झाली  आईचे सुसंस्कार जीवनात कामी आले ,भाऊबंद साथ दिली तर कार्यकत्यांनी मनापासून प्रेम दिले 
*यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुखदेव कुसमुडे,सुरसिंग पवार,पिराजी पागिरे,दत्तात्रेय अण्णा ठाणगे,अर्जून खळेकर,राजुशेट भराडिया,डी के मोरे,डाॅक्टर विठ्ठलदास झवर,नंदूशेट झवर,हरिभाऊ मोरे,साठे सर ,संजय नागदे,
पत्रकार शिवाजी घाडगे,गणेश हापसे आदी भाषणे झाली सूत्रसंचालन कैलास ढोके यांनी केले 
*यावेळी पेढे तुला करण्यात आली तसेच गो शाळे साठी चारा देण्यात आला 
*यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद