अमृत कलश देहरे येथे सुरु

अमृत कलश यात्रेला देहरे येथे
 कृषी कन्यांनी केली सुरुवात 

माझी माती माझा देश या मोहिमे अंतर्गत नगर तालुक्यातील देहरे  गावात अमृत कलश हा कार्यक्रम घेण्यात आला  .
गावातील माती कलशात एकत्रित करण्याचे आव्हाहन कृषी कन्यांनी केले हा अमृत कलश 30 सप्टेंबर पर्यंत अहमदनगर शहरात फिरणार असून या कलशायामध्ये जमा झालेली माती व तांदूळ २७ ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे पाठवण्यात येणार आहे. 
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अब्दुल खान हे होते, यावेळी  महेश काळे यांनी देहरे ग्रामस्थांच्या वतीने मनोगत व्यक्त करून विद्यार्थि यांना मार्गदर्शन केले आणि या कलश यात्रेला शुभेच्छा दिल्या, 
 प्रा सुहास पाखरे  यांनी मनोगत व्यक्त केले, विद्यार्थी ची वकृत्व कला कशी वाढवायची याबद्दल मार्गद्शन केले,
सूत्र संचालन कृषी  कन्या मैथिली सुर्यवंशी हीने केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राध्यापक यांनी केले, माजी सैनिक ईश्वर काळे यांनी देखील विद्यार्थि यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या,
देहेरे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ सलंग्नित डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचालित कृषि महाविद्यालय विळदघाट येथील कृषीकन्या  लांबे पुजा सूर्यभान,  तांबे भैरवी भानुदास, लष्करे प्रथमेशवरी संतोष, मोहिते शुभदा, सूर्यवंशी मैथिली या काही दिवसापासून विविध उपक्रम राबवत असतात, 
या कार्यक्रमास सरपंच नंदा संतोष भगत, उपसरपंच दिपक नाना जाधव, युवा नेते महेश काळे, अमोल काळे,
माजी सरपंच अब्दुल खान, माजी सरपंच किसन धनवटे , माजी सैनिक ईश्वर काळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश काळे,  किरण लांडगे, करंडे प्रविण  ,दिपक बेर्डे  
कार्यक्रमास  कृषी महाविद्यालयाचे प्रा. के. एस. दांगडे , पी.सी .ठोंबरे, डी.पी. मावळे, ,एम .ए.खेडेकर  ,प्राचार्य डॉ. एम. बी . धोंडे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. बी.राऊत, आदी  सह ग्रामस्त उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद