आदर्श पंत संस्थेकडे 72 कोटीच्या ठेवी

अर्थ क्रांती मध्ये अग्रेसर असलेल्या  आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेकडे 73 कोटीच्या ठेवी असून यावेळी संस्थेने 12 टक्के लाभांश आपल्या सभासदाना देणार आहे 
अलिकडेच वार्षिक सर्वसाधारण सभा    अध्यक्ष विष्णुपंत गीते यांच्या अध्यक्षतेखाली झाली 
 यावेळी सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले . संस्थेचे संस्थापक शिवाजी कपाळे यांनी म्हणाले की  पतसंस्थेवर ठेवीदार, कर्जदार, खातेदार, सभासदांचा खूप मोठा विश्वास आहे त्यामुळेच आत्तापर्यंत सुमारे 73 कोटी ठेवींचा टप्पा संस्थेने गाठला आहे सर्व सामान्य माणूस, सामान्य सभासद व व्यावसायिकांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही काम करीत आहोत.
सभासदांना याही वर्षी 12 टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला आहे संस्थेचे सर्व व्यवहार सहकार खात्याच्या नियमानुसार करून सभासद खातेदारांना व्यवहाराच्या उत्तम सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यात आम्हाला सर्व संचालक मंडळ ,सभासद ,कामगार व कलेक्शन एजंट यांचे सहकार्य लाभले आहे यापुढे सर्वांचे असेच सहकार्य लाभेल अशी अपेक्षा चेअरमन विष्णुपंत गीते यांनी व्यक्त केली.
 संस्थेच्या थकबाकीदार सभासदांनी आपले कर्ज वेळेवर भरून संस्थेत सहकार्य करावे व कारवाई टाळावी असे आवाहन यावेळी व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज यांनी केले.
संस्थेचे मॅनेजर ज्ञानेश्वर सोनवणे यांनी अहवाल वाचन केले सभेस संचालक अण्णासाहेब चोथे ,अविनाश साबरे, सुधाकर कदम, मारोती खरात, दत्तात्रय रोडे ,भारत चोथे , पल्लवी सोनी, कमल काळे ,राहुरी अर्बनचे रामचंद्र काळे ,साई आदर्श पतसंस्थेच्या अध्यक्ष  संगीता कपाळे ,राहुरी अर्बनच्या संचालिका  उमा गीते, अन्सार शेख आदींसह सभासद ,कर्मचारी ,कलेक्शन एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होते . आभार प्रकाश सोनी यांनी मानले.


Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद