साई आदर्श पतसंस्थेला पुरस्कार जाहीर
येधील साई आदर्श या पतसंस्थेस अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचा स्थैर्यनिधी संघाचा सहकार समृद्ध पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे.
सहकार क्षेत्रात बळकटी आणणाऱ्या पतसंस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने यावर्षीचा पतसंस्था पुरस्कार 2023 साठी साई आदर्श पतसंस्थेने सादर केलेल्या माहितीच्या आधारे तज्ञ निवड समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार पतसंस्था पुरस्कारासाठी साई आदर्श पतसंस्थेची निवड करण्यात आलेली आहे.
या पुरस्काराचे वितरण दिनांक 21 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील तसेच सहकार आयुक्त अनिल कवडे व बुलढाणा अर्बनचे चेअरमन राधेश्यामजी चांडक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
साई आदर्श संस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे म्हणाल्या की सहकार समृद्धी पुरस्कार म्हणजे आम्ही केलेल्या चांगल्या कामाची पावती आहे. यामध्ये संस्थेचे मार्गदर्शक शिवाजी कपाळे , व्हा. चेअरमन स्वराज गीते व संचालक मंडळ तसेच कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले आहे. सभासद ठेवीदार यांनी मोठा विश्वास आमच्यावर टाकला आहे तो सार्थ ठरत आहे
Comments
Post a Comment