लाच मागणी करणाऱ्या पोलीस हवालदार विरोधात गुन्हा दाखल
लाच मागणी गुन्हा अहवाल
एम आय डी सी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार मुरलीधर खैरे याला लाच मागणी केल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गुन्हा दाखल केला आहे
आलोसे नंदलाल मुरलीधर खैरे, पोलिस हवालदार/301, नेमणूक, एम आय डी सी पोलिस स्टेशन, जि. अहमदनगर
लाचेची मागणी-30,000/-₹ तडजोडी अंती10,000/-₹
लाचेची मागणी दिनांक- ता.26/07/2023
लाचेचे कारण तक्रारदार यांचे कुटुंबिय व त्यांचे शेजारी राहणारे यांच्यामध्ये कचरा गोळा करून पेटवून देण्याच्या कारणावरून दि.10/07/2023 रोजी वाद झाला होता. सदर वादात तक्रारदार यांची भावजयी किरकोळ जखमी झाली होती म्हणून तक्रारदार यांनी एमआयडीसी पोस्टेला गुन्हा नोंदविला होता. त्याअनुषंगाने आलोसे हे तक्रारदार यांचे घरी पंचनामा करणे करिता गेले होते. त्यावेळी आलोसे यांनी तक्रारदार यांचे शेजारी हे तक्रारदार व त्यांचे भाऊ यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार देणार असल्याबाबत सांगितले होते व विनयभंगाची तक्रार न घेता किरकोळ तक्रार घेऊन प्रकरण मिटवुन घेण्याच्या मोबदल्यात 30,000/-रुपयाची लाच मागणी करत असल्याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे नोंदवली होती. त्यानुसार दि. 26/07/2023 रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली सदर लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे खैरे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 30,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 10,000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आज दि.11/10/2023 रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हैश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा अधिकारी
राजू आल्हाट, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर
सहाय्यक सापळा अधिकारी** शरद गोर्डे,पोलीस निरीक्षक ला.प्र. वि. अहमदनगर
पर्यवेक्षण अधिकारी प्रवीण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर
सापळा पथक पोलीस हवालदार संतोष शिंदे,पोलिस नाईक विजय गंगुल, रमेश चौधरी, पोलीस अंमलदार वैभव पांढरे,बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे, सचिन सुद्रुक, चालक पोहेकाँ हारून शेख, दशरथ लाड,
मार्गदर्शक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक माधव रेड्डी सो, अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि नाशिक परिक्षेत्र,नाशिक.
नरेंद्र पवार, वाचक पोलीसउपअधीक्षक, ,ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
आरोपीचे सक्षम अधिकारी - पोलीस अधीक्षक, अहमदनगर.
•••••••••••••••••••••••-
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- 0241- 2423677
@ टोल फ्रि क्रं.1064
Comments
Post a Comment