पद्मश्री राहीबाई पोपरे विद्यापीठा

महात्मा फुले कृषि विद्यापीठात शाश्वत श्रीअन्न शेती या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त शाश्वत श्रीअन्न शेती या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन 4 व 5 नोव्हेंबर, 2023 रोजी विद्यापीठातील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (कृषि)  अनुप कुमार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील असणार आहेत. राज्याचे कृषि विभागाचे अतिरिक्त मुख्य  अनुप कुमार आणि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतुन आणि प्रेरणेतुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
पहिल्या दिवशी सहा तांत्रिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ज्वारी व बाजरी,  नाचणी व बरी, वरई व कोडो, राळा व बर्टी, विपणन, प्रसिद्धी व मूल्य साखळी आणि धोरणात्मक बाबी व भविष्यातील दिशा या विषयांवर तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तांत्रिक सत्रात राज्यातील कृषि विद्यापीठांचे तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या संस्थांचे तृणधान्य पीकविषयक तज्ञ, तसेच कृषि विभागाचे अधिकारी व प्रगतशील शेतकरी हे मार्गदर्शन करणार आहेत. विशेष सत्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या मिशन मिलेट्स या कार्यक्रमाच्या सल्लागार व प्रख्यात आहारतज्ञ श्रीमती ऋजुता दिवेकर दैनंदिन आहारात श्रीधान्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या राज्यस्तरीय परिषदेला राज्यभरातून विविध जिल्ह्यांतून 600 हुन अधिक निमंत्रित शेतकरी बांधव तसेच कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञ, कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. दुसर्या दिवशी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरातील तृणधान्य प्रात्यक्षिके, सेंद्रिय शेती व इतर संशोधन प्रकल्पांच्या प्रक्षेत्र भेटी आयोजीत करण्यात आल्या आहेत

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद