जलयुक्त शिवार योजनेचा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी घेतला आढावा
जलयुक्त अभियानाच्या कामाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांना जलपरिपूर्ण करा
: जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येऊन अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांना जलपरिपूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान-2 बाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ मार्गदर्शन करताना बोलत होते.
बैठकीस जिल्हा जलसंधारण अधिकारी मनोज ढोकचवळे यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन मध्ये जिल्ह्यातील 368 गावांची निवड करण्यात आली असुन यामध्ये अहमदनगर तालुक्यातील 14, नेवासा-12, श्रीगोंदा 14, पारनेर 17, कर्जत 39, जामखेड 22, शेवगाव 17, पाथर्डी 18, श्रीरामपूर 12, राहुरी 19, कोपरगाव 23, राहता 24, संगमनेर 92 तर अकोले तालुक्यातील 45 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये योजनेंतर्गतची कामे अत्यंत दर्जेदारपणे करण्यात यावीत. शासनाच्या निर्देशानुसार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेमध्ये गाळ वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यास एकरी 15 हजार रुपये अनुदान तसेच ग्रामपंचायत किंवा स्वयंसेवी संस्था यांना प्रतिघनमीटर गाळ काढण्यासाठी 31 रुपये इंधन खर्चासाठी अनुदान देण्यात येत आहे. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेची कामे हाती घेण्यात येऊन ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
Comments
Post a Comment