सावधान घोणस या काळात येतात उबेला

सध्या घोणस या अतिविषारी सापाच्या मिलनाचा काळ असल्याने हे सर्प अडगळीच्या ठिकाणांमधुन बाहेर पडतात.हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीपासुन स्वत:च्या शरीराचे तापमान वाढविण्यासाठी ऊब मिळवण्यासाठी ऊन्हात येवून बसण्यासाठी,शेणखताजवळच्या ऊबेला किंवा बाथरूमच्या पाईपमधुन,दाराच्या फटीतुन ऊबदार घरात हे सर्प शिरण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे या कालावधीत यांच्या बाहेर पडण्याने सर्पदंश होण्याच्या प्रमाणात विलक्षण वाढ होते.बागकाम करणार्‍या बागप्रेमींनी व शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांनी काम करताना आपली काळजी घेणे खुप गरजेचे आहे.
मांजरांची नजर अतिशय तिक्ष्ण असते.त्यामुळे मोकळ्या शेतात,रानात घर असणार्‍यांनी मांजर पाळणे खुप फायद्याचे ठरते कळत नकळत मांजर अशा सरपटणार्‍या प्राण्यांबद्दल आपणास सावधान करते,त्यामुळे पुढील अनर्थ टाळता येतात.या सापाचा मुख्य नैसर्गिक शत्रू म्हणजेच मुंगुस त्याच्यामुळेही घोणसची संख्या नियंञणात येते.
पाठीवर असणार्‍या बदामी आकाराच्या एकसारख्या नक्षीवरून हा सर्प चटकन ओळखता येतो,कोणाला जर या सर्पाचा दंश झालाच तर कुठेही कसल्याही प्रकारे वेळ न दवडता रूग्णास त्वरीत नजीकच्या सरकारी दवाखाण्यात दाखल करावे व अॅन्टीवेनम प्रतिविषाची लस घेण्यास प्राधान्य द्यावे.जेवढ्या कमी वेळेत ही लस घेतली जाते तेवढे रूग्णाचे प्राण वाचण्यास व रूग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.सर्पावरील प्रतिविषाची लस प्रत्येक शासकीय तालुकारूग्णालयात उपलब्ध करून ठेवणे बंधनकारक केलेले आहे,तरीही एक सामाजिक बांधिलकी म्हणुन 
 दुर्दैवाने सर्प दंश झाल्यावर गावठी उपचार अथवा कुण्या ठिकाणी रुग्णाला न नेता शक्यतो सरकारी जिल्हा रुग्णालयात न्यावे जेणेकरून येथे औषधे उपलब्ध असतात 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद