एम पी केव्हीचे प्राध्यापक थायलंडला जाणार

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कास्ट प्रकल्पांतर्गत प्राध्यापक थायलंड परदेश दौर्यासाठी रवाना

जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान प्रकल्प नवी दिल्ली, यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाकरिता महात्मा फुले कृषि विद्यापीठात कार्यान्वित असलेले प्राध्यापकवर्ग यांना हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन विषयी कार्यक्षमतेचे बळकटीकरण करण्यासाठी ड्रोन, रोबोट, आय.ओ.टी., कृत्रिम बुध्दीमत्ता, भौगोलिक प्रणाली, रिमोट सेंन्सींग, अर्थ इंजिन इ. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली थायलंड येथे परदेश दौर्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कास्ट प्रकल्पांतर्गत आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कृषि महाविद्यालयातील आठ प्राध्यापक एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बँकॉक, थायलंड येथे रवाना झाले आहे. यामध्ये प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे, मुक्ताईनगर येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्टाता डॉ. संदीप पाटील, डॉ. तुळशीदास बास्टेवाड, डॉ. धीरज कणखरे, डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. सचिन मगर व डॉ. शर्मिला शिंदे या प्राध्यापकांचा समावेश आहे. सदर प्रशिक्षण दि. 1 ते 15 डिसेंबर, 2023 दरम्यान होणार आहे. 
सदर प्रशिक्षणासाठी रवाना होत असलेल्या प्राध्यापकांना शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. पाटील यांनी या प्रशिक्षणाचा उपयोग सध्या शेतीसमोर असलेल्या सर्वात मोठ्या हवामान बदलांच्या आवाहनाला सामोरे जाण्यासाठी रचनात्मक संशोधन व शिक्षण पद्धती विकसित करण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे म्हणून विद्यापीठाने अमेरिका, जपान, मलेशिया, थायलंड, आणि व्हिएतनाम अशा पाच देशांत विद्यार्थी आणि प्राध्यापकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. अशा प्रकारची संधी उपलब्ध करून देणारे महात्मा फुले कृषि विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक तथा कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील गोरंटीवार, कास्ट प्रकल्पाचे सहसंशोधक डॉ. मुकुंद शिंदे, पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्टाता डॉ. सुनिल मासळकर, आंतरविद्याशाखा जल व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, डॉ. अतुल अत्रे व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील कदम यांनी सदर प्रशिक्षणाचे नियोजन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद