अरे बापरे एक कोटीची लाच
अरे बापरे एक कोटीची लाच
नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा
वालावलकर यांच्या पथकाने नगर शहराजवळ सापळा रचून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अहमदनगर उपविभागाच्या सहा.अभियंता (वर्ग 2) याला तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. अमित किशोर गायकवाड (वय 32 टा. प्लॉट नं 2 आनंदविहार नागापुर, अहमदनगर,(मुळ रा. चिंचोली ता.राहुरी) असे त्या सहा.अभियंत्याचे नाव
आहे. दरम्यान,त्याने सदरची लाच स्वतःसाठी तसेच तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या कटीता स्वीकारली असल्याचे सिद्ध झाले आहे.
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
युनिट -ला.प्र.वि. नाशिक
तक्रारदार- पुरुष, 58 वर्ष.
आलोसे
क्र.1) *किशोर गायकवाड* , वय- 32 वर्ष, व्यवसाय - नोकरी , पद- सहाय्यक अभियंता, वर्ग 2, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उपविभाग अहमदनगर, जिल्हा- अहमदनगर
*क्र.2) गणेश वाघ वर्ग 1 तत्कालीन उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उपविभाग अहमदनगर, जिल्हा- अहमदनगर
सध्या नेमणूक - कार्यकारी अभियंता, धुळे, जिल्हा- धुळे लाचेची मागणी- १ कोटी रुपये
दि. 20/10/2023
लाच स्वीकारली-
1 कोटी रुपये
दि. 03/11/2023
लाचेचे कारण यातील तक्रारदार यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,अहमदनगरच्या
औद्योगिक वसाहती मध्ये 1000 एमएम व्यासाची लोखंडी पाईपलाईन बदलण्याचे कामाचे मंजूर निविदेनुसार 31,57,11,995/- रुपयाचे रकमेचे 5 टक्के प्रमाणे अनामत रक्कम 1,57,85,995/- रुपये तसेच सदर कामाचे सुरुवातीची सुरक्षा ठेव रक्कम 94,71,500/- रुपये झालेल्या कामाचे अंतिम देयक 14,41,749/- रुपये असे एकूण 2,66,99,244/- रुपये तक्रारदार यांना मिळावे म्हणुन सदर बिलावर आलोसे क्र.2 गणेश वाघ यांचा मागील तारखेचे आऊट वर्ड करून त्यावर आलोसे क्र.2 वाघ यांचा सह्या घेऊन सदर देयक त्यांच्याकडे पाठविण्याचा मोबदल्यात आलोसे क्र.1 अमित गायकवाड यांनी स्वतः साठी तसेच आलोसे क्र.2 गणेश वाघ यांचेकरीता तक्रारदार यांचे सदर कामाचे बिलाचे व यापूर्वी अदा केलेली काही बिलांची बक्षीस म्हणून 1,00,00,000/- रुपये लाचेची मागणी करून लाच स्विकारली म्हणुन गुन्हा----
आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी*
मुख्य कार्यकारी अधिकारी,
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,महाराष्ट्र राज्य सापळा अधिकारी
श्री स्वप्निल राजपूत ,पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक
पो.ना.प्रभाकर गवळी,
पो. ना. संदीप हांडगे,
पो. ना. किरण धुळे ,
पो.ना.सुरेश चव्हाण
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
मा माधव रेड्डी
अपर पोलिस अधिक्षक,
ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक.
नरेंद्र पवार
वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक.
"याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दुरध्वनी क्रमांक-
02532578230,
टोल फ्री क्रमांक १०६४ .
Comments
Post a Comment