आदिनाथ कराळे यांची व्यापारी संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड
कधी काळी पोपट पारख व आधापुरे दादा यांनी अनेक वर्ष व्यापाऱ्यांचे नेतृत्व केले कालानुरूप ते पडद्या आड गेले मात्र आता व्यापर वाढल्याने संघटना वाढत आहे ही भुषणाची बाब म्हणावी लागेल
मनोज जंरागे पाटील यांना पाठिबा देण्यात मते मतांतरे झाल्याने राहुरी फॅक्कटरीवर तिसऱ्या व्यापारी संघटना स्थापन झाली असून अध्यक्ष पदी माजी नगरसेवक व शिवबाचे संस्थापक आदिनाथ कराळे यांची सर्वान मते निवड करण्यात आली आहे
राहुरी फॅक्टरी येथील सर्व व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व्यापाऱ्यांना पाठबळ देण्यासाठी व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी राहुरी फॅक्टरी येथे व्यापारी संघटनेची नुकतीच स्थापना करण्यात आली असून या संघटनेच्या अध्यक्षपदी आदिनाथ कराळे यांची उपाध्यक्षपदी जयेश मुसमाडे तर कार्याध्यक्षपदी प्रशांत काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
राहुरी फॅक्टरी येथील श्री सप्तशृंगी माता मंदिर येथे शनिवारी ४ ऑक्टोबर रोजी शेकडो व्यावसायिकांच्या उपस्थित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राहुरी फॅक्टरी येथील छोटे-मोठे व्यापारी यांच्या अडचणी, बंदबाबत विचारविनिमय, मासिक बैठक, अन्याय झालेल्या दुकानदाराला मदत याबाबतीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत अध्यक्षपदी कराळे उपाध्यक्षपदी मुसमाडे कार्याध्यक्षपदी काळे तर सल्लागारपदी ऋषी राऊत, सचिवपदी वैभव गाडे, खजिनदार विजय भोसले यांची निवड करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment