ट्रेडीशनल बेल्ट रेसलिग राज्य उपाध्यक्ष पदी आघाव

ट्रेडीशनल बेल्ट रेसलिंगच्या राज्य उपाध्यक्षपदी पहिलवान राजकुमार आघाव पाटील यांची नियुक्ती
 युनायटेड वर्ल्ड रेसलिंगची मान्यता असलेल्या ट्रेडीशनल बेल्ट रेसलिंग महाराष्ट्र राज्य संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी पहिलवान राजकुमार लक्ष्मण आघाव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष सी.ए. तांबोळी यांनी आघाव पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा . यावेळी उमर मुख्तार तांबोळी उपस्थित होते.
 राजकुमार आघाव पाटील नांदगाव शिंगवे (ता. नगर) येथील असून, त्यांनी जागतिक कुस्तीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना तीन वेळा कास्य पदक पटकाविले आहे. ते एक उत्तम कुस्तीपटू असून, नवोदित कुस्तीपटूंना ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी मार्गदर्शन करत असतात. तसेच कुस्ती खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी सातत्याने त्यांचे कार्य सुरु आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आघाव पाटील यांची संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल जिल्हा सचिव संतोष खैरनार व जिल्हाध्यक्ष संतोष भुजबळ शुभेच्छा दिल्यात 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद