जेल तोडून पळाले ओरीपी निघाले कच्चे शेवटी नगरचे पोलीस तपासात पक्के
संगमनेर जेलमधून पळालेले आरोपी निघाले कच्चे अण पोलीस तपासात निघाले पक्के
चार आरोपी सह मदत करणारे दोघे
सहा जणांना ताब्यात घेऊन पुन्हा जेलची हवा दाखवली अवघ्या काही तासांतच पोलीसांनी ही कारवाई केल्याने आरोपीची दिवाळी तुरुंगात तर पोलिसांचा शिमगा होण्या पासून बचाव झाला हे मात्र नक्की
मुळात जेल गज हे गजुन कमकुवत झाल्याने ते सहज कापले जाणे सहज शक्य होत असावे मात्र चार आरोपींना तुरुंगात साहीत्य पुरवणाराचा शोध पोलीस घेतीलच
संगमनेर सबजेल मधील न्यायालयीन कोठडीतून पळुन गेलेले 4 आरोपी व त्यांना वाहनातुन पळून जाण्यास मदत करणारे आरोपीसह जेरबंद करण्यात यश आले.
बुधवारी संगमनेर सबजेलमधील बॅरेक क्रमांक 3 मधील न्यायालयीन कोठडीतील कैदी नामे राहुल देवीदास काळे, (संगमनेर तालुका पोलीस स्टेशन) गु.र.नं. 61/2020 भादविक 302, 307 कैदी नामे रोशन रमेश ददेल ऊर्फ थापा (संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 419/2021 भादविक 376), कैदी नामे आनंद छबु ढाले (संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 511/2021 भादविक 376), कैदी नामे मच्छिंद्र मनाजी जाधव (घारगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 165/2022 भादविक 302, 307, 34) हे न्यायालयीन कोठडीत असताना 06.44 वा. चे दरम्यान बॅरेक क्रमांक 3 चे दक्षिण बाजुकडील 3 गज कापुन त्यातून बाहेर येवुन पांढ-या रंगाच्या कारमधुन अज्ञात इसमासह कायदेशिर रखवालीतून पळून गेल्याने पोहेकॉ/368 आनंद बबनराव धनवट वय 46 वर्षे ने. संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांचे तक्रारी वरुन संगमनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. 916/2023 भादविक 224, 225 प्रमाणे गुन्हा दाखल होता.
घटनेचे गांभिर्य पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींचा शोध घेवुन तात्काळ ताब्यात घेणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये दिनेश आहरे यांनी अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदारयांचेसह घटना ठिकाणी भेट देवुन घटनास्थळावरुन सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. त्यावरुन घटनेचा अभ्यास करुन व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्ह्याचा पुढील तपास करुन कैदी राहुल देवीदास काळे, रोशन रमेश ददेल ऊर्फ थापा आनंद छबु ढाले,मच्छिंद्र मनाजी जाधव यांना तसेच आरोपींना पळुन जाण्यास मदत करणारे वाहन चालक व एक साथीदार अशा एकुण 6 आरोपींना जामनेर, जिल्हा जळगांव येथुन वाहनासह ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, संतोष लोढे, विशाल दळवी, संदीप चव्हाण, पोकॉ अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, चापोहेकॉ उमाकांत गावडे व चापोहेकॉ संभाजी कोतकर व संगमनेर तालुका पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोहेकॉ जायभाय यांचे पथकाने केली आहे.
Comments
Post a Comment