विद्यापीठातील सेवानिवृत्त कार्यकाल 65 ?

कृषि विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे ?
विशेष @पत्रकार शिवाजी घाडगे 
एकीकडे तरुणांना नोकरया नाहीतर दुरीकडे बुजुर्ग आपली जागा सोडायला तयार नाही विद्यापीठातुन बाहेर जायचे नसेल तर स्मशान भुमी बाधने देखील गरजेचे झालेय असेच म्हणावे लागेल 
गेली तेरा वर्ष झाले उच्च शिक्षित तरुण भरती कडे डोळे लावून बसले आहेत मात्र त्याचा विचार करायला वेळ कोणाला आहे 
राज्यातील शेतकरी अनेक समस्यांनी झुंजत आहे, त्याच्यासमोर हवामान बदलाचे संकट आ वासून उभे आहे. याचा सामना करण्यासाठी राज्यातील कृषि विद्यापीठांनी अत्याधुनिक काल सुसंगत संशोधन करून कात टाकण्याची गरज आहे. परंतु, कृषि विद्यापीठातील शिक्षण व संशोधनाचा गाडा केवळ ४५ टक्के प्राध्यापक हाकत आहेत. गेल्या तेरा वर्षांपासून शासनाने शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदभरतीच केली नाही. एकीकडे नव्याने भरती नाही, तर दुसरीकडे जुन्याच लोकांचे निवृत्ती वय वाढवण्याचा घाट घालून जुन्याच लोकांना वारंवार संधि दिली जात आहे. २०१५ पूर्वी कृषि विद्यापीठातील प्राध्यापकांचे सेवानिवृत्ती वय ६० वर्षे होते. एप्रिल २०१५ मध्ये त्यात वाढ करून सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे करण्यात आले. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील इतर पारंपरिक विद्यापीठांमध्ये सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आहे परंतु कृषि विद्यापीठांमध्ये हे वय ६२ वर्षे असताना ते ६५ करण्याची मागणी आता केली जात आहे.  त्या प्रकारची मागणी प्राध्यापकांच्या काही संघटना करत आहेत.
या मागणीचे समर्थन करण्यासाठी निवृत्त होणाऱ्या लोकांच्या रिक्त जागाणमुळे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या विद्यापीठ मानांकणाच्या प्रतवारीत (University Rankings) राज्यातील कृषि विद्यापीठांची घसरण होईल अशी भीती दाखवली जात आहे. परंतु, सद्यस्थितीतच या प्रतवारीत (University Rankings) राज्यातील कृषि विद्यापीठे रसातळाला आहेत. या वरील उपाय म्हणून कृषि विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी केली जात आहे. हे म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी गत झाली. या मानांकणामध्ये राज्यातील कृषि विद्यापीठांची प्रतवारी सुधारवयाची असेल तर सद्यस्थितीत त्याचा एकमेव उपाय म्हणजे शिक्षक वर्गीय अधिकारी व तत्सम पदांची तातडीने भरती करणे. त्याचा फायदा कृषि विद्यापीठांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवण्यासाठी व संशोधनाचा दर्जा सुधरवण्यासाठी देखील होईल.
निवृत्ती वय वाढवण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाल्यास कृषि शाखेतून प्राध्यापक पदासाठी पत्र असलेल्या उमेदवारांना आणखी काही वर्षे नोकरीपासून दूर राहावे लागणार आहे कारण नवीन पदभरती न करण्यासाठी राज्य शासनाला हे एक कारण मिळेल. एकीकडे विद्यापीठांमध्ये रिक्त जागांचा डोंगर असताना व दुसरीकडे त्यासाठी आवश्यक नव्या दमाचे, अत्याधुनिक ज्ञान असलेले कुशल मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना देखील, कृषि विद्यापीठातील शिक्षक वर्गीय अधिकाऱ्यांचे निवृत्तीची वयोमार्यादा वाढवून या जागा अधिक काळासाठी रिक्त ठेवणे योग्य नाही. सरकारच्या अशा अन्यायकारक धोरणामुळे उच्च शिक्षित तरुणांच्या प्राध्यापकाची नोकरी मिळवण्याच्या स्वप्नावर पानी फेरले जात आहे. 
सध्या कार्यरत अनेक प्राध्यापकांच्या निवृत्तीचा काल जवळ आला आहे. तत्पूर्वी निवृत्तीचे वय वाढवून घेण्यासाठी संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वारंवार वाढविण्यात सरकारला काय स्वारस्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद