आंतराष्ट्रीय संमेलन आयोजन

आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन
राहुरी-
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील जागतीक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे दि. 20-21 डिसेंबर, 2023 रोजी भविष्यातील शेती या विषयावर आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या आंतरराष्ट्रीय संमेलनात एक आंतरराष्ट्रीय परिषद व पाच आंतरराष्ट्रीय परिसंवाद होणार आहेत. या संमेलनात आधुनिक कृषि तंत्रज्ञान या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आणि कृषिमध्ये ड्रोनचा वापर, कृषिमध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता व हायपरस्पेक्ट्रल इमेजेस, इंडोर फार्मिंग, कृषिमध्ये यंत्रमानवाचा उपयोग, कृषिमध्ये आय.ओ.टी. चा वापर या पाच विषयांवर परिसंवाद होणार आहेत. संमेलनाचा उद्देश म्हणजे विद्यार्थी, शास्त्रज्ञ, शेतकरी, नवोद्योजक यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करुन देणे, जगात सुरु असलेले तंत्रज्ञानातील बदल अवगत करुन देणे, नविन तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर, शेतीत होत असलेल्या वेगवान तंत्रज्ञान बदलामधील धोरणे, पर्यावरण पुरक तंत्रज्ञानाची ओळख करुन देणे हा आहे.
परिसंवादांमध्ये संबंधित विषयानुसार तज्ञ आपले संशोधन सादर करणार आहेत. आंतरराष्ट्रीय संमेलनात विद्यार्थी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, उद्योजक, नवोद्योजक सहभागी होऊन आपले संशोधनपर लेख सादर करु शकतील. उत्कृष्ठ सादरीकरणास प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. या संमेलनात जास्तीत जास्त विद्यार्थी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, उद्योजक यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संमेलनाचे निमंत्रक व प्रमुख संशोधक, कास्ट तथा संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार आणि सहनिमंत्रक तथा सहसंशोधक कास्ट डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले. 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद