जुनी पेन्शन कामबंद आंदोलन
महात्मा फुले कृषि विद्यापीठात जुनी पेशंन योजना लागु करण्यासाठी कर्मचार्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरु झाले असुन याचा मोठा परिणाम झालाय शासकीय व निमशासकीय नोकर जुणी पेशंन पुन्हा सुरु करावी म्हणून गुरुवार पासून संपावर गेले आहेत राहुरी तहसील कार्यालय देखील शुकशुकाट दिसून आला समोर संभा घेण्यात आली
जुनी पेशंन योजना लागु करण्यासाठी राज्यसरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, मुंबई या संघटनेशी सलग्न असलेल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठातील या आंदोलनात नविन पेशंनमध्ये (एन.पी.एस.) समाविष्ठ असलेले हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. झालेल्या आंदोलनात या कर्मचार्यांनी पदव्युत्तर महाविद्यालयापासून प्रशासकीय इमारतीपर्यंत भव्य रॅली काढली. या ठिकाणी कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कर्मचार्यांनी एकच मिशन-जुनी पेशंन अशा घोषना दिल्या. त्यानंतर सर्व कर्मचारी बाईक रॅलीने राहुरी येथे गेले. त्या ठिकाणी तहसील कार्यालयात प्रशासनाच्या वतीने पोलिस निरिक्षक संजय सोनवणे यांनी निवेदन स्वीकारले. हे आंदोलन महात्मा फुले कृषि विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी समन्वय संघाचे उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम, कार्याध्यक्ष डॉ. संजय कोळसे, उपाध्यक्ष दत्तात्रय कदम, बाबासाहेब अडसुरे, पाडुरंग कुसळकर, सचिव देवीदास घाडगे, महिला प्रतिनिधी श्रीमती शितल जगदाळे, श्रीमती रेखा गोसावी, माधुरी औताडे, डॉ. प्रकाश मोरे, देवेंद्र वंजारे आदींसह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. विद्यापीठाच्या दहाही जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील कर्मचार्यांनी तेथील प्रमुख अधिकार्यांना संपाबाबतचे निवेदन दिले व संपूर्ण दिवसभर ठिय्या आंदोलन केले.
Comments
Post a Comment