दिव्यांग सेवा संस्थेचा वर्धापन साजरा
- दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे प्रथम वर्धापन व जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगा साठी अंत्योदय रेशन कार्ड व संजय गांधी निराधार योजना अर्ज संकलन शिबिर , ,तसेच तीन दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल व एका दिव्यांग बांधवांना कानाचे मशीन वाटप माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त दादा तनपुरे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पोकळे यांच्या शुभहस्ते पुण्यश्लोक अहिल्याभवन या ठिकाणी करण्यात आले या कार्यक्रमा चे अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय तमनर हे होते. जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांच्यावाढदिवस असल्याने केक कापून सत्कार आ.प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच झी मराठीसारेगमप लिटल चॅम्प मध्ये उपविजेता जयेश खरे याचा सत्कार करण्यात आला.
मधुकर घाडगे यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले दिव्यांग शक्ती सेवा संस्थेत स्थापन करून एक वर्षात माणुसकीची भिंत या उपक्रमांतर्गत 30 दिव्यांग बांधवांना दिव्यांग उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले संस्थेच्या माध्यमातून दोन दिव्यांग व्यावसाय उभा करून देण्यात आल. दिव्यांग भगिनीस एक भाजीपाल्यासाठी हात गाडी व दुसऱ्या दिव्यांग बांधवास फोटो फ्रेम चा व्यवसाय करण्यासाठी टपरी देण्यात आली. या वर्षांमध्ये 500 हून अधिक दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजना व 150 दिव्यांग बांधवांना अंत्योदय रेशन कार्डचा लाभ तहसील कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आला. आनंद ऋषी नेत्रालय अ नगर यांच्या माध्यमातून 400 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे मोफत नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात शिबिराचा लाभ देण्यात आला. संस्थेच्च्या प्रयत्नाने ब्राह्मणी ग्रामपंचायत माध्यमातून दिव्यांगासाठी दोन व्यवसाय गाळे बांधण्यात आले राहुरी खुर्द येथील ग्रामपंचायत च्या माध्यमातून पाच गुंठे जागा मिळवली. दोन दिव्यांग आजारी पेशंट साठी तीस हजार रुपयाची मदत केली. राहुरी तालुक्यातील पन्नासहून अधिक दिव्यांग बांधवांचे दिव्यांग वित्त महामंडळाकडे कर्ज प्रस्ताव दाखल करण्यात आले दहा दिव्यांग बांधवांना बीज भांडवल कर्ज मिळवून दिले 250हुन अधीक दिव्यांग बांधवांना रेल्वे पास मिळून दिले वेगवेगळ्या शिबिर आयोजित करण्यात येत असते. मधुकर घाडगे यांनी राहुरी शहरामध्ये दिव्यांग बांधवांसाठी फिजिओथेरपी सेंटर दिव्यांग आश्रम विरंगुळा केंद्र स्थापन करण्यासाठी जागा व बांधकाम उपलब्ध करून द्यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली
आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की राहुरी नगरपालिका 2016 पासून बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली दिव्यांगाचे प्रश्न सोडवले जातात यावर्षी तर दिवाळीच्या अगोदरच पाच टक्के निधी वाटप करण्यात दादासाहेब मोरे , बाबुराव शिंदे सर जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख तालुका अध्यक्षा छाया हारदे संघटक तुकाराम बाचकर अभियंता शेळके साहेब सुभाष कोकाटे सर अ.नगर तालुकाध्यक्ष किशोर सूर्यवंशी संदेश रपाडिया श्रीगोंदा तालुकाप्रमुख राजेंद्र पोकळे महिला संपर्कप्रमुख भिमाबाई शिर्के गवळी प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे यांनी केले यावेळी अंतोदय रेशन कार्ड साठी व संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज 300 हुन आधीक अर्ज संकलन करण्यात आले ते तहसीलदार साहेबांकडून पाठपुरावा करून मंजूर करण्यात येईल हा कार्यक्रम पार पडण्यासाठी तालुकाध्यक्ष योगेश लबडे दत्तात्रय खेमनर संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी महिला अध्यक्ष अनामिका हरेल तालुका समन्वयक नानासाहेब शिंदे कार्याध्यक्ष सुरेश दानवे शहर कार्याध्यक्ष संजय देवरे सर्व संघटक राजेंद्र आघाव विठ्ठल पाडे सर्व शाखा अध्यक्ष यांनी परिश्रम घेतले
Comments
Post a Comment