राजे शिवाजी चारित्र्य संपन्न होते-डाॅ सबनीस
छत्रपती शिवाजी महाराज चारित्र्य संपन्न होते जेष्ठ साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस महिलाचा आदर भाव, नैतिकता व धर्मातीत राजकारण या गोष्टी आजच्या काळासाठी फार गरजेच्या व महत्वाच्या आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः त्याबद्दल एक आदर्श घालून दिला आहे. शिवरायांनी नेहमी स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली. तसेच त्यांचे राजकारण हे नेहमी धर्माच्या पलीकडचे राहील अशा प्रकारची स्त्री व धर्माविषयीची समतेची दृष्टी ठेवण्याची शिकवण छत्रपती शिवरायांची होती असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना संचालनाल...