एम पी के व्ही विद्यापीठात बेकरी प्रशिक्षण

विद्यापीठामध्ये बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने दि. 18 ते 22 मार्च, 2024 या कालावधीत बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 वी पास/नापास असलेल्या बेरोजगारांना ब्रेड, नानकटाई, लादीपाव, स्वीट बन्स, नागली (नाचणी) बिस्कीट, टोस्ट, सुरती (जीरा) बटर, कप केक हे बेकरी पदार्थ प्रत्यक्षात शिकण्याची तसेच बेकरी उद्योगासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्रे देण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्या कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 02426-243259 यावर संपर्क साधण्याचे आवाहन या विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम कड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद