श्रीरामपूरात लाचखोर पोलीस व त्याच्या साथीदाराला पकडले

श्रीरामपूर लाच खोर पोलीस हेड कॉन्स्टेबल व खाजगी इसम लाच घेताना पकडला रघुनाथ आश्रुबा खेडकर व खाजगी व्यक्ती राजु शामकुमार श्रीवास्तव असे दोघाची नावे असुन शनिवारी रात्री उशीरा दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते 


 रघुनाथ आश्रुबा खेडकर,वय-55 वर्षे, पोहेकॉ ब. नं. 563, नेमणूक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन,ह.रा. पोलीस वसाहत, घुलेवाडी, संगमनेर जि. अहमदनगर मु. रा. चिंचपूर इजदे ता. पाथर्डी जि. अहमदनगर 
2) खा. इ. राजू शामकुमार श्रीवास्तव,वय-46 वर्षे,धंदा-चहाची टपरी, रा. के. व्हि. रोड,भैय्या गल्ली,श्रीरामपूर ता. श्रीरामपुर,जि.अहमदनगर 
▶️ *लाचेची मागणी-*
         20,000/- रुपये तडजोडीअंती 12000/- रुपये
लाच स्विकारली-
        12,000/ रुपये
हस्तगत रक्कम-
         12,000/-रुपये 
लालेची मागणी
      दि.01/06/2024
लाच स्वीकारली
      दि. 01/06/2024

लाचेचे कारण
यातील तक्रारदार यांचे भावाच्या नावे टाटा एच जी व्ही टिप्पर  मालकीचा होता,सदर टिप्पर त्यांच्या भावानी  दि. 22/12/2023 रोजी वाहन खरेदी पावती करून त्यांचे नातेवाईकास विकून ताब्यात दिला होता. सदर टिप्पर दि.05/02/2024 रोजी अवैद्य मुरूम वाहतूक करतेवेळी तहसील कार्यालय श्रीरामपूर यांनी पकडून तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे जमा केला होता.  सदरचा टिप्पर  तहसील कार्यालय श्रीरामपूर आवारातून चोरी झाला होता त्यावरून अज्ञात इसमाविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन  येथे दि.07/02/2024 रोजी गुरनं  144/2024 भादवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल  असून सदर गुन्ह्याचा तपास आलोसे खेडकर हे करत होते.तपासामध्ये तक्रारदार यांचेकडुन टिप्पर खरेदी केलेले नातेवाईक व त्यांच्या चालकानेच टिप्पर चोरी केल्याचे निष्पन्न झालेने तक्रारदार यांचे नातेवाईक व टिप्पर चालकाला आलोसे खेडकर यांनी सीआरपीसी 41 (1)(अ) प्रमाणे नोटिस दिली होती.सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने आलोसे  खेडकर यांनी दि.31/05/2024 रोजी यातील तक्रारदार यांची भेट घेऊन तक्रारदार यांच्याकडे त्यांचे भावाकरिता सीआरपीसी 91 प्रमाणे नोटीस दिली व सदर  गुन्ह्या मध्ये तक्रारदार यांचे भावाचे नाव न येण्याकरिता तक्रारदार यांचेकडे  40000/- रुपयांची मागणी करुन तक्रारदार व त्यांचे टिप्पर खरेदी केलेले नातेवाईक यांना आज दि. 01/06/2024 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे बोलविले असल्याबाबतची तक्रार ला प्र वि अहमदनगर कडे दिनांक 01/06/2024 रोजी प्राप्त झाली होती त्यानुसार दि. 01/ 06/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली,पडताळणी दरम्यान 
आलोसे क्र.1 यांनी तक्रारदार  यांच्याकडे पंचांसमक्ष 20000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 12000/-रुपयांची मागणी केली व सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली.यशस्वी सापळा कारवाई दरम्यान सदरची लाच रक्कम आलोसे खेडकर यांनी खाजगी इसम राजु श्रीवास्तव यांच्याकडे  देण्यास सांगितली असता  खाजगी इसम श्रीवास्तव यांनी आलोसे यांचे सांगणे वरुन आलोसे तसेच पंचासमक्ष लाच स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले  तसेच आलोसे खेडकर यांना ताब्यात घेवुन आलोसे खेडकर व खाजगी इसम श्रीवास्तव यांचे विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 हॅश व्हॅल्यू घेण्यात आली  आहे.
सापळा  व तपास अधिकारी
राजू आल्हाट,
पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. अहमदनगर. मोबा.नं.9420896263
सापळा पर्यवेक्षण अधिकारी
 प्रवीण लोखंडे, पोलीस उपअधीक्षक, ला प्र. विं, अहमदनगर, मो. क्र.7972547202
सापळा पथक 
 पोलिस अंमलदार किशोर लाड, बाबासाहेब कराड , गजानन गायकवाड, चापोहेकॉ  दशरथ लाड
मार्गदर्शक
 मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
 मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक 
मो नं 9404333049
सहकार्य
नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 9822627288

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद