लाचखोर मुख्याध्यापिकेला रंगेहाथ पकडले

लाच स्विकारताना मुख्याध्यापिकेला रंगेहाथ पकडले 45 हजार रुपये लाच 
सगिता पवार असे लाचखोर मुख्याध्यापिकेचे नाव असून आपल्या विद्यालयातील शिक्षक सेविकेचे वेतन निच्छिती काढण्या साठी लाचेची मागणी केली होती याची तक्रार शिक्षिकेच्या पतीने नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कडे तक्रार केली 


तक्रारदार- पुरुष, वय- 55 वर्ष, धंदा सेवानिवृत्त,
रा.शिरसगाव, ता.श्रीरामपूर,
जि.अहमदनगर
आरोपी -  श्रीमती संगीता नंदलाल पवार, वय 53 वर्ष, मुख्याध्यापिका, वर्ग-2, सौ. सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा, श्रीरामपूर, जि.अहमदनगर रा. दत्तनगर, पोस्ट टिळक नगर, तालुका
श्रीरामपूर,जि.अहमदनगर
लाचेची मागणी-50,000/ -
तडजोडी अंती-45,000/-
लाच स्विकारली - 45,000/- ₹
लाच मागणी व लाच स्विकारली दिनांक -12/06/2024
लाचेचे कारण तक्रारदार यांची पत्नी सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा, श्रीरामपूर येथे उप शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सदरची शाळा शासन अनुदानित आहे. तक्रारदार यांचे पत्नीचा सन 2015 ते 2022 या कालावधीतील वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाची रक्कम रुपये 1,62,367/- मिळाली आहे. तक्रारदार यांचे पत्नीचे वरिष्ठ वेतन श्रेणीचे फरकाच्या बिलाचे काम करून देण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात श्रीमती संगीता नंदलाल पवार,मुख्याध्यापिका सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा, श्रीरामपूर ह्या 50,000/-₹ लाचेची मागणी करत असले बाबतची तक्रार ला प्र वि अहमदनगर कडे आज दिनांक 12/06/2024 रोजी प्राप्त झाली होती, सदर तक्रारीच्या अनुषंगाने आज दिनांक 12/06/2024 रोजी  सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा, श्रीरामपूर येथे लाच मागणी पडताळणी केली असता यातील आरोपी लोकसेविका संगीता पवार यांनी तक्रारदार यांचे कडे पंचासमक्ष 50,000/-₹ लाच मागणी करुन तडजोडीअंती 45,000/-₹  लाच मागणी केली व ती लाच रक्कम  स्वीकारण्याचे मान्य केले, त्यानुसार आज दि.12/06/2024
रोजी शंकरराव गायकवाड ग्रामीण एज्युकेशन संस्था श्रीरामपूर संचलित सुभद्रा मुलींचे वसतीगृह, श्रीरामपूर येथे आरोपी लोकसेविका पवार यांचे विरुद्ध सापळा लावण्यात आला असता सदर सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेविका पवार यांनी यातील तक्रारदार यांचेकडुन पंचासमक्ष 45,000/-₹
लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी -प्रवीण लोखंडे, 
पोलीस उपअधीक्षक,
ला.प्र. वि. अहमदनगर
मो.न.7972547202
सापळा पथक -  पोलीस अंमलदार
बाबासाहेब कराड,किशोर लाड,
वैशाली शिंदे,
चालक हरून शेख
मार्गदर्शक श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, 
आरोपीचे सक्षम अधिकारी - अध्यक्ष, शंकरराव गायकवाड ग्रामीण एज्युकेशन सोसायटी श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर.
-------•••••••••••••••••••••••-----
 सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
@ टोल फ्रि क्रं. १०६४

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद