कृषी सहसंचालक यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठात भेट
पुणे विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक रफिक नाईकवाडी व अहमदनगरचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाच्या प्रक्षेत्रावर भेट दिली. यावेळी विभाग प्रमुख डॉ. महानंद माने यांनी विभागाच्या प्रक्षेत्रावर राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. नाईकवाडी यांनी केशर आंबा कलमे विक्री सुरु असलेल्या रोपवाटिकेस भेट देवून पाहणी केली व दर्जेदार केशर आंबा कलमे रोपे निर्मिती केल्याबद्दल कौतुक केले. प्रक्षेत्रावरील गांडूळ खत निर्मिती युनिट, व्हर्मी वॉश युनिटची उपयुक्तता जाणून घेतली. विभागाच्या प्रक्षेत्रावरील आधुनिक सिंचन उद्यानास भेट देवून तेथील ठिबक सिंचन, सूक्ष्म तुषार संच, तुषार संच, फॉगर्स, जेट्स, इत्यादी सिंचन प्रणालीचे विविध प्रकार रेनगन सिंचन शेती पंपाचे विविध प्रकार यांची माहिती घेतली. राष्ट्रीय कृषि विकास योजनेमार्फत या प्रक्षेत्रावर सौर ऊर्जेद्वारे चालणारी सेन्ट्रल पिव्होट सिंचन प्रणाली हा प्रकल्प कार्यन्वित होत आहे.
Comments
Post a Comment