मुळा धरणातुन पाणी सुटणार

मुळा धरणातुन  दुपारी पाणी सुटणार 
 नगर जिल्हाची जल सजवणी म्हणून ओळख असलेले 
दुपारी मुळा नदीत विसर्ग 
राहुरीच्या मुळा धरणाची पाणी साठवण क्षमता 26 दशलक्ष घनफूट 
  एवढी असुन  आजघडीला 88 टक्के पाणी धरणात जमा झाले आहे 
 धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार लोअर गाईड व अप्पर गाईड कर्व्हनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सोमवारी 12 ऑगस्ट सोमवारी दूपारी 3-00  वाजता मुळा धरणातून 2 हजार क्यूसेक्सने नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. 
आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असुन मुळा नदीकाठच्या गावांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले आहे.
  नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रातील चल मालमत्ता, चीजवस्तु ,वाहने, पशुधन , शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. नदीपात्रात प्रवेश करु नये. 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद