पुण्यात साखर परिषद आयोजन

कृषि महाविद्यालय, पुणे येथे साखर व संलग्न उद्योग परिषद 2024 चे आयोजन

महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे, मिटकॉन कन्सल्टन्सी अॅण्ड इंजिनियरिंग सर्विसेस लि. पुणे, साखर आयुक्तालय, पुणे आणि दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने साखर व संलग्न उद्योगांचे चक्रीय अर्थव्यवस्था आणि पर्यावरणपूरक शाश्वततेसाठी साखर व संलग्न उद्योग परिषद 2024 चे आयोजन  8 ते 9 ऑगस्ट, 2024 रोजी कृषि महाविद्यालय, पुणे येथील डॉ. शिरनामे सभागृहात करण्यात आलेले आहे. 
         महाराष्ट्र राज्यातील साखर उद्योगाचे राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. परंतु, सद्य परिस्थितीत हवामान बदलाच्या परिस्थितीमुळे साखर कारखानदारीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीकोनातून अत्याधुनिक व शाश्वत

 तंत्रज्ञानाबद्दलची जागरूकता बहुतांश साखर कारखान्यांकडे नसल्याने आजही पारंपरिक पद्धतींचा अवलंब होत आहे. त्यामुळे पर्यावरणीय गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येते. शासनाच्या नविन पर्यावरण विषयक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी अत्याधुनिक शाश्वत तंत्रज्ञानाबाबतची जाणीव जागृती साखर कारखान्यांमध्ये व्हावी या हेतूने साखर व संलग्न उद्योगांचे चक्रीय अर्थव्यवस्था आणि पर्यावरणपूरक शाश्वततेसाठी योगदान या विषयी साखर व साखर उद्योगांशी संलग्न कारखान्यातील अधिकारी, पर्यावरण संबंधित केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ यांनी एकत्र येऊन या बाबतीत विचारांची महत्वपूर्ण देवाणघेवाण व विचारमंथन करावे यासाठी दोन दिवशीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
       सदर परिषदेचे उद्घाटन पुणेचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे हस्ते होणार असून  समारंभाचे अध्यक्ष म्हणून महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी.जी. पाटील उपस्थित असणार आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथील महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, महाराष्ट्र राज्य पर्यावरण मुल्यांकन समितीचे चेअरमन डॉ. दिपक म्हैसकर, महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, पुणे येथील मिटकॉनचे कार्यकारी संचालक आनंद चलवादे, पुणे येथील विस्माचे अध्यक्ष  बी.बी. ठोंबरे, महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभागाचे संचालक डॉ. अभय पिंपळकर, कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे कार्यकारी संचालक श्री. संजय खताळ, सांगली येथील सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लि. राजेवाडीचे चेअरमन  एन. शेशागिरी नारा, सोलापूर येथील जकराया शुगर लि. वटवते चेअरमन अॅड. बी. बी. जाधव, पुणे येथील विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले, कोल्हापूर येथील दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा  जितेंद्र माने देशमुख आणि कृषि महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांची उपस्थिती असणार आहे.

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद