जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे यांना महाराष्ट्र शासन चा वसंतराव नाईक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
पत्रकार शिवाजी घाडगे यांना महाराष्ट्र शासनचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ,कृषी मंत्री धनंजय मुंडे ,कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे,कृषी सचिव जयश्री भोज यावेळी उपस्थित होते
जलव्यवस्थापन व कृषी विषयी उल्लेखनीय विपुल लेखन केल्या बद्दल जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे यांना शेतीमित्र पुरस्कार मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट कल्ब ऑफ ईडीया येथे रविवारी 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन याच्या हस्ते वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला
जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे याना या आगोदर सरकार चा जलनायक व राष्ट्रीय जल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असून महाराष्ट्र राज्य शासनाचे ग्रंथमित्र पुरस्कार व महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे
Comments
Post a Comment