बियाण्यांच्या रांगोळीतून मतदान जागृती
अकोले तालुक्यातील देवगाव येथील ममताबाई व जिजाबाई भांगरे यांनी गावरान बियाण्यांचा वापर करत मतदार जागृतीसाठी अनोख्या रांगोळ्या साकारल्या आहेत.
या रांगोळ्यांच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश, मतदान यंत्र, निवडणूक आयोगाचे चिन्ह, आणि मतदानाची तारीख यांचे देखणे चित्रण करण्यात आले आहे. या कल्पकतेतून, ग्रामीण महिलांना व नवमतदारांना २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव, सहाय्यक अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप समन्वयक अधिकारी सविता कचरे मतदान जनजागृतींसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
बायफ संस्थेच्या मदतीने, ममताबाई भांगरे गेल्या १५ वर्षांपासून अन्नमाता म्हणून ग्रामीण भागातील महिलांशी संवाद साधत आहेत. भातशेतीच्या कामात व्यस्त असलेल्या महिलांना त्यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले आहे. या अनोख्या उपक्रमाद्वारे, त्यांनी महिलांना व नवमतदारांना 'हातातील कामे थांबवा आणि मतदानाला चला' असे आवाहन केले आहे. मतदान हा लोकशाहीचा आत्मा असल्याचे स्पष्ट करत, त्यांनी गावरान बियाण्यांच्या रांगोळीतून जनतेला लोकशाहीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment