शेतकऱ्यांसाठी फलोत्पादन प्रक्षिण
- मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना फलोत्पादन व अनुषंगिक विषयावर संस्थानिहाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून इच्छुक शेतकऱ्यांनी प्रशिक्षणासाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला रोपवाटीका, कृषी व्यापाराबाबत धोरण व निर्यातीबाबत माहिती, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, ड्रॅगनफ्रुट व जिरॅनियम व नाविन्यपूर्ण पिकांचे उत्पादन, प्रक्रिया व विपणन, हरितगृह, पॉलीहाऊस व्यवस्थापन हॉर्टीकल्चर एक्सपोर्ट प्रशिक्षण, फळे व भाजीपाला काढणीपश्चात व्यवस्थापन आदींबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तीन ते पाच दिवसांच्या या निवासी प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षण साहित्य, चहापान, भोजन व निवास व्यवस्था आदी सुविधा पुरविण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.
Comments
Post a Comment